हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कंगना रनौत आणि वाद यांचे अगदी घट्ट आणि जगातून आगळेवेगळे नाते आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती चित्रपटांहून अधिक चर्चेत असते. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर कंगनाने केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर तिच्यावर ट्विटरकडून त्वरित कारवाई करण्यात आली. या कारवाईत कंगनाची ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर कंगना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह झाली आहे. पण आता इन्स्टाग्रामनेही कंगनाचा साथ सोडायचे ठरवलेले दिसतेय. इंस्टाग्रामने तिची एक पोस्ट डिलीट केली आणि कंगना यावर चांगलीच संतापली. यावर व्यक्त होत म्हणाली कि, इथे आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकणे अवघड आहे.
कंगनाने काल म्हणजेच ८ मे रोजी ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर करीत दिली होती. पण तिच्या या पोस्टवरही चांगलाच वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण होताच इन्स्टाग्रामने तिची ही पोस्ट लगेचच डिलीट केली. यानंतर कंगनाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत चांगलाच संताप व्यक्त केला. ‘इन्स्टाग्रामने माझी एक पोस्ट डिलीट केली़ ज्यात मी कोव्हिड संपवण्याची धमकी दिली होती. माझ्या या पोस्टमुळे कुणाच्या तरी भावना दुखावल्यात. अतिरेकी आणि कम्युनिस्टांबद्दल सहानुभूती असलेले दुखावले, हे तर मी ट्विटरवर पाहिले आहे. पण कोव्हिडचा फॅन क्लब आहे, हे हैराण करणारे आहे. इन्स्टावर दोनच दिवस झालेत. पण इथेही मी आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकेल, असे वाटत नाहीये,’ असे कंगनाने इन्स्टास्टोरीवर लिहिले आहे.
कंगनाने काल तीला कोरोनाची लागण झाली असल्याची बातमी शेअर केली होती. हि पोस्ट या वादाचे नेमके कारण ठरली. कंगनाची पोस्ट वाद निर्माण करत असल्याचे भासतेच इंस्टाग्रामकडून ती डिलीट करण्यात आली. या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले होते कि, ‘ गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यात सौम्य जळजळ होत होती आणि थोडासा अशक्तपणा जाणवत होतो. हिमाचलला जाण्याचा बेत होता.
https://www.instagram.com/p/CNeiREFBZxp/?utm_source=ig_web_copy_link
त्यामुळे काल माझी कोव्हिड टेस्ट झाली आणि आज मी पॉझिटीव्ह आले. मी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. हा व्हायरस माझ्या शरीरात आहे, याची मला कल्पना नव्हती. पण आता मला कळलेय आणि मी या व्हायरसचा समूळ नायनाट करणार आहे. कृपया, या व्हायरसला अजिबात घाबरू नकोस. तुम्ही जितके घाबराल तितका तो घाबरवेल. चला तर, या कोव्हिड-१९ला नष्ट करूयात. एका फ्लूशिवाय हा दुसरा काहीही नाही. हर हर महादेव,’.