सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा येथे गेल्या दोन दिवसांपासून इंटक कर्मचाऱ्यांच्यावतीने संप सुरू असून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगार संहिता रद्द करून कामगार भरतीची मागणीहि कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. बँकांकडून गोरगरीबांकडून कर्ज वसुली केली जाते. मात्र, बँकांना चुना लावणाऱ्यांना हे केंद्र सरकार काही करत नाही,असा आरोप यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.
सातारा येथे आज इंटक कर्मचाऱ्यांच्यावतीने सरकारच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड वसंत नलावडे म्हणाले की, केंद्र सरकारने कृषी कायद्याप्रमाणे संसदेत कोणतीही चर्चा न करता सप्टेंबर 2020 च्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात चार कामगार संहिता जेणेकरून कामगारांना गुलाम केले जाईल अशा पद्धतीने कामगार कायदे मंजूर केले. भांडवलदारांच्या हिताकरिता जो कायदे मजूर करून घाट घातला आहे. त्याला आमचा विरोध आहे. बँकांचे विलीनीकरण, खासगीकर सुरु आहे. बँकांकडून गोरगरीबांकडून कर्ज वसुली केली जाते. मात्र, बँकांना चुना लावणाऱ्यांच्या विरोधात हे सरकार काही करत नाही.
[better-ads type=’banner’ banner=’197269′ ]
गॅसचे दर वाढत आहेत. ४८ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी या मोदींच्या काळात आलेली आहे. तरुणांनी, महिलांनी काय करायचे, सार्वजनिक उद्योगांनी काय करायचे? कष्ट करणाऱ्या हातांनी काय करायचे? याच्या करिता आज हा संप करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या अनेक निर्ययामुळे किमान वेतन, कामाचे तास, औद्योगिक कलह, सामूहिक वाटाघाटी या बाबतीतील कामगारांच्या अधिकारांवर गदा आली आहे. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमुळे कामगारांचे नोकरीतील स्थैर्य गमावले जाणार असून त्यांची बाजारातील पत शून्य होणार आहे. त्यामुळे याचा निषेध आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला.