हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी आज काँग्रेस कार्यकारणी समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला गांधी कुटुंबियांसह सर्व वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती आहे. सोनिया गांधींना नेतृत्व बदलासाठी पत्र लिहणाऱ्या नेत्यांवर राहुल गांधी नाराज असून ते नेते भाजपला मिळाले असल्याची बतावणी राहुल गांधींनी केल्याची अफवा तात्काळ पसरवण्यात आली. यानंतर गुलाब नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी इतके वर्षं प्रामाणिक राहून आम्ही भाजपला मिळालेले कसे असा सवाल ट्विटरद्वारे उपस्थित केला.
यावर राहुल गांधींनी आपण तसं काही म्हटलंच नसल्याचा खुलासा केला आणि सिब्बल यांनी ते ट्विट मागे घेतलं. यावरुन काँग्रेस अध्यक्षपदावरुन काँग्रेस नेत्यांमध्येच दुफळी माजवण्याचा प्रकार समोर आला.
Was informed by Rahul Gandhi personally that he never said what was attributed to him .
I therefore withdraw my tweet .
— Kapil Sibal (@KapilSibal) August 24, 2020
दुसऱ्या एका प्रकरणात मध्यप्रदेशचे गृहमंत्री आणि भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांची मुलं रिहान आणि मायरा हेसुद्धा काँग्रेस अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार असल्याची खोचक टीका केली. काँग्रेस हा असा पक्ष आहे जिथं मुख्याध्यापकांची मुलं शाळेत पहिली येतात अशी टीका नारोत्तम मिश्रा यांनी केली आहे.
कांग्रेस में नेतृत्व के लिए वैसे तो कई योग्य उमीदवार हैं। असल में @INCIndia ऐसा स्कूल है जहां विद्यार्थी चाहे जितनी मेहनत कर लें लेकिन फर्स्ट तो हेडमास्टर का बेटा ही आएगा। वहां सब कुछ तय स्क्रिप्ट के मुताबिक ही होता है।#CongressPresident pic.twitter.com/UfAfW6zsMm
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) August 24, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’