कुलभूषण जाधव यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु…….
हेग | पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर आंतराष्ट्रीय न्यालयात सुनावणी सुरु आहे. जेष्ठ वकील हरीश साळवे हे भारताच्या वतीने बाजू मांडत आहेत.पाकिस्तान जाधव यांना चुकीच्या पद्धतीने अडकवत आहे ते निर्दोष आहेत, असा युक्तिवाद साळवे यांनी केला.
पाकिस्तानने जाधव यांच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे. जाधव यांना दूतावासाशी संपर्क करण्यास दिले नाही.तसेच ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये व्हिएन्ना परिषदेत सहमती करार झाला होता’, असे ते म्हणाले. या करार नुसार पाकिस्तान जाधव यांना दूतावासाशी संपर्क करून देण्यास बांधील आहे. असा युक्तिवाद त्यांनी लावून धरला.जाधव यांच्या संबंधात भारताने पाठवलेल्या १३ स्मरण पात्रांची उत्तरे पाकिस्तानने दिली नाहीत.
कुलभूषण यांच्यावर लावलेल्या आरोपांवर सविस्तर माहिती देण्याबाबत पाकिस्तान टाळाटाळ करीत आहे.यामुळे व्हिएन्ना करारातील अटींवरून पाकिस्तानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न साळवे करीत आहेत. या करारांचा विविध कलमांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, पाकिस्तान कसा भारताच्या एक निर्दोष नागरिकाचा जीव घ्यायचा प्रयत्न करत आहेत. भारताकडे जाधव यांच्या अपहरणाचे पुरावे आहेत.
इतर महत्वाचे
‘गोली का जवाब गोली से’ जवानांना बीजेपीची साथ
झारखंड च्या सुधारणेसाठी केंद्र सरकारने उचलली ही पावले …
राहुल गांधी यांच्या त्या मिठी मारण्यावर काय म्हणाले नरेंद्र मोदी वाचा.