नवी दिल्ली, वृत्तसंस्था | पुलवामा हल्ल्यानंतर भारताने १२ दिवसांनी जैश-ए-मोहमदला चोख प्रतिउत्तर दिले आहे. भारतीय वायुसैनिकांनी पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर बॉम्बबारी केली. मिराज २००० या जेट ने पाकिस्तानातील बाळकोट, मुजफ्फराबाद आणि चकोटी येथील दहशतवादी ठिकाणे उद्वस्थ करून टाकली आहेत.
पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी घोषित केले होते की सशस्त्र दलांना स्ट्राइकला प्रतिसाद देण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला. भारताने पाकव्याप्त काश्मीर मध्ये हल्ला केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. भारताकडून या हल्ल्याबाबत अद्याप दुजोरा मिळाला नाही तरी पाकिस्तानने भारताच्या हल्ल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज पहाटे ३.३० वाजता भारतीय वायुसेनेने लष्करी कारवाई केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारताच्या १० मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मद च्या अड्ड्यावर १ हजार किलो चे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे.यावेळी पाकिस्तान सेनेने भारतावर उलट हल्ला केल्यावर भरतीय विमान माघारी परतली असल्याचा दावा पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटर वरून केला आहे.
भारतीय वायुसेने
इतर महत्वाचे –
कर्णबधिर आंदोलकांच्या ‘या’ आहेत मागण्या
एका पत्रकाराचं बाळासाहेबांना खुल पत्र…
आमच्या सभ्यतेला आमची कमजोरी समजू नका – सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानवर हल्लाबोल
सामान्य लोकांबरोबरच सैनिकांच्या पाठीशी देखील मी ठामपणे उभा – उदयनराजे भोसले