हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या प्राणघातक कोरोना व्हायरसच्या भीतीने गुंतवणूकदारांनी जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये मोठी विक्री केली आहे. गुरुवारी जपान, चीन, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या भागातील शेअर बाजारात ३ टक्क्यांची घसरण झाली आहे. याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीवर दिसून येत आहे. आज सकाळी लवकर उघडल्यानंतर सेन्सेक्स २०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. त्याचबरोबर निफ्टी ७० अंकांनी खाली आला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आत्तापर्यंत १७० हून अधिक लोक मरण पावले आहेत. वुहान शहराव्यतिरिक्त बीजिंगमध्येही या व्हायरसच्या संसर्गाचे एक प्रकरण आढळले आहे. त्यानंतर बीजिंग प्रशासनाने लोकांना जास्तीत जास्त प्रवास करण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना व्हायरसच्या दहशतीत शेअर मार्केट
मीडिया रिपोर्टनुसार व्हायरसमुळे जगभरातील एअरलाइन्सने चीनसह अनेक शहरांमध्ये आपल्या सेवा बंद केल्या आहेत. चीनसह जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळं जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये चीनचा मोठा वाटा असल्यानं त्याचा परिणाम जागतिक बाजारावर दिसत आहे.
गुंतवणूकदार आता काय करावे
सेठी फिनमार्टचे एमडी विकास सेठी म्हणतात की,”कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे बाजारात विक्रीचे वातावरण आहे. बजेटपूर्वी बाजार सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे, परंतु तरीही गुंतवणूकदारांना थोडी सहजतेने बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात येईल. गुंतवणूकदारांनी निवडक समभागात गुंतवणूक करावी. येत्या २ दिवसात स्टॉक्समध्ये मोठी हालचाल दिसून येईल.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-