खासदार इम्तियाज जलील यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

0
70
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | सध्या मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र तरी देखील व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता भासत आहे. यावरून खासदार जलील यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. केंद्र सरकारच्यावतीने मराठवाड्याला ‘पीएम केअर फंड’ मधून १५० व्हेंटिलेटर देण्यात आले, परंतू त्यातील अनेक खराब असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत त्यांनी हा आरोप केला.

‘पीएम-केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला १५० व्हेंटिलेटर मिळाले आहेत मात्र, त्यातील बरेचशे खराब आहेत. ज्या हॉस्पिटलला ते मिळाले त्यांच्या सांगण्यानुसार हे व्हेंटिलेटर अत्यंत सुमार दर्जाचे असून कोरोना रुग्णांसाठी ते उपयोगी पडतील अशी शक्यता कमीच आहे. यामध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधानांडून आलेले व्हेंटिलेटर असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार.’, असे ट्वीट खासदार जलील यांनी केले आहे.

दरम्यान, जलील यांनी आरोग्य कर्मचारी भरतीसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता त्यांनी व्हेंटिलेटरवरून थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here