देशमुखांवरील ED ची कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतीक…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी सरकारचा गोटात एकच खळबळ उडाली आहे. ‘ED ची अनिल देशमुखवरील कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचा व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतीक आहे’ अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत केले आहे.

त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे कि,’ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचा प्रतीक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी प्रयत्न आहे तसंच राजकीय सूडबुद्धीही आहे. अशा आशयाचे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक

पुढे आणखी ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले आहे की, ‘परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला? आणि जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे’.

Leave a Comment