अवैध लॉटरीवर निर्बंध आणण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवैध लॉटरीमुळे राज्याच्या महसुलाचं मोठं नुकसान त्यावर निर्बंध आणण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. आज मंत्रालयात झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याविषयी माहिती देताना अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये अजित पवार लिहितात,”अवैध लॉटरीमुळे, अन्य राज्यांच्या ऑनलाईन लॉटरीतून मिळणाऱ्या राज्याच्या महसुलाचं मोठं नुकसान होतंय. त्यामुळे अवैध लॉटरीवर निर्बंध आणण्याची गरज आहे. त्यासाठी वित्त विभाग, पोलिस व लॉटरी वितरकांनी संयुक्तपणे प्रयत्न करायला हवे.” यासंदर्भात पश्चिम बंगाल सरकारने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी पोलिस व वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक पाठवून, माहिती घेऊन त्यानुसार पुढील निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली. लॉटरीच्या महसुलातून वाढलेली रक्कम पोलिस दलाच्या गृहनिर्माणासाठी वापरण्यात येईल.”

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment