Light गेली तरी चिंता सोडा; हा Bulb देईल 12 तास उजेड, किंमतही कमी

Inverter bulb
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात प्रगती होत असताना अजूनही असे काही भाग आहेत ज्याठिकाणी वेळेवर लाईट मिळत नाही, आणि अनेकदा तर बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विजेची वाट बघावी लागते. सहसा रात्रीच्या वेळी विजेशिवाय राहणं अवघड असतं. परंतु तंत्रज्ञानाच्या या जगात कधी कशाचा शोध लागेल हे कोणाला माहित आहे? आज आम्ही तुम्हाला असाच एक अविष्कार म्हणून इन्व्हर्टर बल्ब बद्दल माहिती देणार आहे. हा बल्ब लाईट गेली तरी 12 तास चालू शकतो.

बाजारात आता नवीन इन्व्हर्टर बल्ब आलेला आहे. ज्यामुळे रात्रीच्या वेळी लाईट गेल्यावर आपण तो लावून सर्व कामे करू शकतो. या बल्बमध्ये बॅटरी सुद्धा देण्यात आलेली आहे. हा बल्ब मल्टी कलर ऑप्शन मध्ये येत असून एकदा चार्जिंग केल्यानंतर बारा तास सुरू राहू शकतो. ज्या ठिकाणी रात्रभर वीज खंडित होते किंवा त्या ठिकाणी इन्व्हर्टर नाहीये अशा ठिकाणी हा इन्व्हर्टल बल्ब उपयोगी पडू शकतो . या इनव्हर्टर बल्बमध्ये 2200 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

कुठे खरेदी कराल –

तुम्हीही हा इन्व्हरर्टर बल्ब खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ई-कॉमर्स साइटवर हा बल्ब 990 रुपयांना उपलब्ध आहे. पण सध्याच्या ऑफर नुसार, तुम्हाला इन्व्हर्टर बल्ब 47 टक्के सवलतीत फक्त रु. 520 मध्ये खरेदी करू शकता. एवढेच नाही तर अमेझॉन वरून हा इन्व्हर्टर बल्ब खरेदी करू शकता. या इन्वर्टर बल्ब वर एक वर्षाची वॉरंटी देखील देण्यात येते.