हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : कमी कालावधीमध्ये भरपूर पैसे मिळवण्यासाठी अनेक लोकांकडून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली जाते आहे. मात्र, यासाठी शेअर बाजाराबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. कारण यामध्ये जसा फायदा होतो तसेच नुकसानही होऊ शकते. जर आपल्याला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून जास्त रिटर्न मिळवायचा असेल भारताशिवाय जगातील मोठ्या शेअर बाजारामध्येही गुंतवणूक करता येईल.
भारतातील अनेक तज्ञ गुंतवणूकदारांना नेहमीच दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. यामुळे पैसे बुडण्याचा धोका कमी होतो आणि सोबतच चांगला रिटर्नही मिळतो. मात्र मार्केट नीट समजून घेतले तर शॉर्ट टर्मसाठीही गुंतवणूक करून नफा मिळू शकेल. याद्वारे देखील अनेकदा मजबूत फायदा मिळतो. तर आजच्या या बातमीमध्ये आपण भारतात बसून अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Stock Market) गुंतवणूक कशी करावी ते जाणून घेउयात…
अमेरिकन शेअर्समध्ये करता येईल गुंतवणूक
शेअर बाजारातील नाविन्यपूर्ण सेवांमुळे आता भारतीय गुंतवणूकदारांनाही इंटरनॅशनल ब्रोकरेज अकाउंट उघडण्याची सुविधा मिळते आहे. याद्वारे परदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येते. जर आपल्याकडे इंटरनॅशनल ब्रोकरेज अकाउंट असेल तर याद्वारे ग्लोबल स्टॉक, ईटीएफ किंवा फंड खरेदी करता येतील. इथे हे लक्षात घ्या कि, भारतीय ब्रोकरेज हाऊस वापरून अमेरिकन ब्रोकरकडे सहजपणे खाते उघडता येते. Stock Market
स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करावी लागणार
अमेरिकन ब्रोकरकडे खाते उघडण्यासाठी गुंतवणूकदारांना फक्त स्कॅन केलेल्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. यानंतर अगदी सहजपणे ऑनलाइन खाते उघडता येईल. याद्वारे अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी थोड्या प्रमाणात गुंतवणूक करूनही सुरुवात करता येईल. यामध्ये मिनिमम बॅलन्सची काळजी न करता मुक्तपणे गुंतवणूक करता येते. हे लक्षात घ्या की, यामध्ये झिरो सबस्क्रिप्शन प्लॅन आणि शून्य ब्रोकरेज प्लॅन देखील उपलब्ध आहेत. Stock Market
खाते पूर्णपणे सिक्योर असेल
अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन कौन्सिल इन्शुरन्स (SIPC Insurance) कडून सिक्योरिटी देखील मिळते. यामध्ये ग्राहकांच्या परवानगीशिवाय, त्यांच्या खात्यात ठेवलेले सिक्युरिटीज कोणत्याही कारणासाठी वापरले जाऊ शकत नाहीत. यामध्ये US $ 5 लाख पर्यंतचा इन्शुरन्स देखील मिळतो. मात्र, त्यामध्ये शेअर बाजारातील नुकसानीचा समावेश नाही. तसेच यामध्ये बाकीच्या शेअर मार्केटप्रमाणेच गुंतवणूकीची जोखीम देखील आहे. ज्यामुळे यामध्ये गुंतवणूक करावी की नाही हा सर्वस्वी आपला निर्णय आहे. Stock Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.wsj.com/market-data/stocks
हे पण वाचा :
Jio च्या ‘या’ प्लॅन अंतर्गत Netflix सबस्क्रिप्शन सहीत मिळवा अनेक फायदे
आता Visa शिवाय ‘या’ देशांत मिळणार प्रवेश, सर्वात स्वस्त देश कोणता ते पहा
एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स
New Business Idea : वर्षभर मागणी असणारा ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न
Bank Loan वसुलीचे नियम काय आहेत ??? बँकेच्या एजंटने कर्जाच्या वसुलीसाठी धमकावल्यास त्वरित करा ‘हे’ काम