दररोज फक्त 67 रुपये गुंतवा आणि करोडोपती व्हा!! जाणून घ्या या भन्नाट स्किमविषयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2024 या नव्या वर्षात तुम्ही गुंतवणूक करून चांगले पैसे कमावू शकता. दररोज फक्त 67 रुपयांची गुंतवणूक करून दीर्घ मुदतीवर गुंतवणूक केली तर तुम्ही कोट्यवधींचे मालक होऊ शकता. तुम्ही दर महिन्याला 2024 रुपये गुंतवले तर भवितव्यात मोठी बचत होऊ शकेल, मोठा निधी मिळू शकेल. तुम्हाला आयुष्यात येऊन 1 कोटी रुपयांच्या जवळपास रक्कम मिळवायची असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2024 रुपयांची एसआयपी करणे आवश्यक आहे. या गुंतवलेल्या रकमेवर तुम्ही 12% व्याज मिळवू शकता. याच पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करत राहिलात तर 24 वर्षात तुमचा कॉर्पस 33,85,519 रुपये होऊ शकतो.  दुसरीकडे, जर तुम्ही एक स्टेप अप एसआयपी केली आणि दरवर्षी तुमची गुंतवणूक 24 पैकी निम्म्याने म्हणजेच 12% ने वाढवली तर 24 वर्षात तुमची गुंतवणूक 1 कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचू शकते. तुम्हाला 24 वर्षांनी या गुंतवणुकीवर मिळणारी रक्कम 90,50,840 रुपये म्हणजे जवळपास 1 कोटी मिळू शकते.

तुम्हाला 24 वर्षांनी मिळणारा निधी हा 1 कोटीच्या जवळपास मिळणार आहे. त्यानंतरही तुम्ही ही रक्कम पुन्हा गुंतवली तर यावर तुमचा घरखर्च भागून जास्त रक्कम मिळू शकते. 24 वर्षांनंतर जमा झालेला 90,50,840 रुपयांचा निधी तुम्ही 6-8% दराने अन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवू शकता. यामुळे तुम्हाला दररोज सरासरी 1500-2000 रुपयांदरम्यान रक्कम मिळू शकते. जर तुम्ही सर्व पैसे 6% व्याजाने कोणत्याही बँकेत गुंतवले तर तुम्ही या रकमेवर वार्षिक 5,43,050 रुपये व्याज मिळवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला मिळणारी मासिक रक्कम 45,254 रुपये एवढी मिळू शकते. हिशेबाप्रमाणे दररोज ही रक्कम 1500 रुपयांच्या आसपास होऊ शकते.

समजा तुम्हाला 24 वर्षांनंतर मिळणाऱ्या रकमेवर 8 टक्के व्याज मिळत असेल तर वार्षिक रक्कम 724,067 रुपये एवढी मिळू शकेल. दर महिन्याला 60,338 रुपये एवढी रक्कम तुम्हाला मिळू शकेल. दररोज ही रक्कम सुमारे 2000 रुपये मिळू शकते. तुम्ही गुंतवत असलेली रक्कम ही अत्यल्प म्हणजे दिवसा 67 रुपये आहे. कारण 1 महिन्यात तुम्ही 2024 रुपये गुंतवत आहात. आणि हे तुमच्या कमाईच्या दृष्टीने खूप सोपे काम आहे. तुम्ही दर दिवसाला 67 रुपये एवढी कमी व परवडणारी बचत नक्कीच करू शकता. परंतु काही लोकांना प्रश्न पडतो की, एवढी छोटी रक्कम गुंतवून जास्त परतावा कसा मिळेल ? ज्यांना यापेक्षा अधिक रक्कम गुंतवायची असेल तर ते गुंतवणुकीवर अधिक चांगली रक्कम मिळवू शकतात.

तुम्हाला अधिकाधिक गुंतवणुकीवर परतावा मोठा हवा असेल तर एकापेक्षा जास्त एसआयपी करण्याची गरज आहे. मोठ्या गुंतवणुकीची वात न पाहता आपल्याला जेवढे परवडते तेवढी रक्कम तुम्ही महिन्याला गुंतवू शकता. गुंतवणुकीवर मोठा निधी हवा आहे तर मोठ्या गुंतवणुकीची वाट पाहणे योग्य नाही. तुमची आर्थिक स्थिती ज्याप्रमाणे वाढत जाईल, तशी गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. 1 पेक्षा जास्त एसआयपी करणे तुम्हाला जास्त परतावा मिळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक करायची असेल तर आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता. त्यामुळे तुमची होणारी फसवणूक टळेल.