गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडेअकरा लाखांची फसवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई 

मसाल्याच्या व्यापारात अधिक नफा असल्याची बतावणी करून हॉटेल व्यावसायिकांची तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक  केल्याची घटना अमरावतीच्या चांदुर बाजार शहरात उघडकीस आली या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी हरीश देवराव दिपाळे, जगदीश देवराव दिपाळे व अमोल जगदीश दिपाळे स्टार चौक चांदूरबाजार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

अमरावतीच्या चांदूर बाजार येथील आठवडी बाजारात भोजनालय चालवणारे अमोल चंद्रकांत चौधरी सह अन्य लोकांकडून आरडी व एलआयसी एजंट असल्याचे सांगून मसाला व्यवसायात पैसे गुंतवा फार अधिक नफा आहे.असे सांगत एकाच कुटूंबातील या तिघांनी अमोल चौधरी यांना तबल 11 लाख 50 हजार रुपयांचा चुना लावला.

चौधरी यांनी पैसे मागितले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली.तक्रारी वरून तिघांविरुद्ध अमरावतीच्या चांदुर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment