Investment Tips : चांगल्या भविष्यासाठी ‘अशा’ प्रकारे करा पैशांची गुंतवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : भविष्यात आपल्याला आर्थिक अडचणी होऊ नये यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असतात. पैशाची कमी पडू नये यासाठी त्याची व्यवस्थित आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक (Investment Tips) करणे कधीही फायद्याचे ठरते. यासाठी जितक्या लवकर आपण रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करायला सुरुवात करू तितके जास्त पैसे जमा करता येतील. यामुळे पैशांची बचतही होईल.

रिटायरमेंटचे प्लॅनिंग म्हणजे रिटायरमेंटनंतर लागणार्‍या पैशांचा अंदाज लावणे. रिटायरमेंटच्या प्लॅनिंग साठी आपल्याला एफडी, डेट फंड किंवा इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल. ही रक्कम जमा करण्यासाठी, आपल्याला स्वतःच्या जोखीम क्षमतेवर आधारित सेव्हिंग आणि इन्वेस्टमेन्टचे प्लॅनिंग करावे लागेल. त्यामुळे रिटायरमेंटपूर्वी आपले पैसे सरकारी बचत योजनांमध्ये ट्रान्सफर करावा. कारण इथे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील. आज आपण जाणून घेऊया असे काही गुंतवणूकीची ठिकाणी जिथे आपले पैसे सुरक्षित राहतील आणि आपल्याला त्याबदल्यात चांगले रिटर्न सुद्धा मिळतील

पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड

रिटायरमेंटसाठी पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड सर्वांत चांगले आहे. या खात्यात दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक (Investment Tips) करता येईल. जे 15 वर्षांसाठी असेल. 15 वर्षांनंतर हे खाते 5-5 वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड देखील करता येते. यावर सध्या 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. जे दरवर्षी कंपाउंडिंग केले जाते. तसेच यामधील गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्स बेनेफिट्स देखील मिळते.

नॅशनल पेन्शन सिस्टीम

नॅशनल पेन्शन सिस्टीम देखील रिटायरमेंटसाठी चांगले आहे. यामध्ये, रिटायरमेंटवर एकरकमी तसेच दरमहा पेन्शनची तरतूद आहे. यामध्ये दोन प्रकारची खाती असतात. पहिले खाते टियर-1 तर दुसरे टियर-2 अंतर्गत उघडली जातात. टियर 1 हे प्राथमिक खाते आहे आणि टियर 2 हे ऐच्छिक खाते आहे. NPS खात्यात मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्हाला किमान 40 टक्के रक्कम एन्युइटी स्कीममध्ये गुंतवावी लागेल. या एन्युइटीतून दरमहा पेन्शन मिळते.

हे ही वाचा : Investment Tips : ‘या’ म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीवर मिळतील चांगले रिटर्न

हे ही वाचा : Investment Tips: भरपूर पैसे कमावण्यासाठी फॉलो करा ‘या’ 4 पद्धती

Leave a Comment