हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या आर्थिक भविष्यासाठी पैशाची बचत आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेच आहे. आजकालच्या महागाईच्या युगात पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवून त्या पैशाचा वापर आपल्या भविष्यासाठी करण्याचा अनेकांचा प्रयत्न असेल. मात्र सध्या ,मार्केट मधील स्थिती वाईट आहे तसेच बँकेत जर आपण पैसे जमा केले तर त्यावर मिळणारे व्याजही कमी असते. अशा परिस्थितीत पैशांची गुंतवणूक कुठे करायची ?? त्याबदल्यात आपल्याला किती रिटर्न मिळेल असे अनेक प्रश्नबी तुम्हाला पडू शकतात. पण चिंता करू नका, या सर्व प्रश्नाची उत्तरे म्हणजे Public Provident Fund…. होय PPF मध्ये पैशांची गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे सुरक्षित राहतीलच आणि तुम्हाला चांगले रिटर्न्स देखील मिळू शकतात.
अल्प बचत योजनेतील सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगली योजना आहे. तुम्ही कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या शाखेत पीपीएफ खाते उघडू शकता. 15 वर्षांच्या पीपीएफ खात्यात व्याज देखील चांगले आहे. तज्ज्ञांचा असा दावा आहे की पीपीएफ खात्यात ठराविक रक्कम योग्य वेळी जमा केली तर काही काळानंतर ही रक्कम नक्कीच तुमच्या भविष्यात उपयोगी पडू शकते.
सध्या PPF वर ७.१ टक्के व्याज मिळत आहे. यामध्ये गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतची कर सूट उपलब्ध आहे. PPF खाते सक्रिय ठेवण्यासाठी, एका वर्षात कमीत कमी 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. पीपीएफ ही सरकारची योजना असल्याने यामध्ये जमा केलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि रिटर्न्सही जास्त मिळतो .
किती रिटर्न्स मिळू शकतो-
जर तुम्ही PPF खात्यात 15 वर्षांसाठी दरवर्षी 1.50 लाख रुपये जमा केले तर 15 वर्षांत 22.50 लाख रुपये जमा होतील. यावर वार्षिक ७.१ टक्के दराने व्याज मिळते आणि चक्रवाढीचा लाभही मिळतो. तर एकूण व्याज सुमारे 18.18 लाख रुपये मिळेल. अशा प्रकारे 15 वर्षांनंतर तुम्हाला तुमच्या PPF खात्यातून एकूण 40.68 लाख रुपये मिळतील.
जर तुम्ही हे खाते मॅच्युरिटीनंतर 5-5 वर्षांपर्यंत वाढवून पूर्ण 25 वर्षे चालवले, तर जमा केलेली एकूण रक्कम 37.50 लाख रुपये आहे. यावर, 7.1% दराने, वार्षिक व्याज आणि चक्रवाढ रक्कम सुमारे 65.58 लाख रुपये आहे. आणि अशा प्रकारे 25 वर्षांनंतर तुम्हाला तुमच्या PPF खात्यातून 1.03 कोटी रुपये मिळू शकतात.
5 तारखेपर्यंत पैसे जमा करा
प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंतच पीपीएफ खात्यात पैसे जमा करणे फायदेशीर आहे. असे केल्याने, जमा केलेल्या रकमेवर संपूर्ण महिन्यासाठी व्याज उपलब्ध होते . कारण, PPF वरील व्याज दरमहा मोजले जाते परंतु पेमेंट वार्षिक आधारावर केले जाते. PPF वरील व्याज चालू महिन्याच्या शेवटच्या तारखेपासून पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंतच्या किमान ठेवीवर मोजले जाते.
कर सवलतीचा तिहेरी फायदा-
PPF मधील गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळणारे व्याज, या वर कर सूट मिळते. PPF मधील गुंतवणुकीवर तुम्ही 1.50 लाख रुपयांपर्यंतची कर सूट घेऊ शकता. याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही PPF खात्यात वर्षभरात १२ पेक्षा जास्त वेळा पैसे जमा करू शकत नाही. मात्र तुम्ही एकाच वेळी 1.50 लाख रुपये देखील जमा करू शकता.