काही लोक पावसाळ्यातील छत्र्यांसारखे कधीतरी उगवतात आणि… ; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेतून भोंग्याबाबत अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. यावरून राजकीय नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधला. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी राज ठाकरे, खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. “मशिदीवरील भोंग्यांवरून राज्य सरकारला अल्टिमेटम देण्यात आला. काही लोक पावसाळ्यातील छत्र्यांसारखे कधीतरी उगवतात. त्यांच्याकडून राजकीय स्वार्थासाठी धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. राज ठाकरे यांचं जेवढं वय नाही तेवढं शरद पवारांनी राजकारण केलं आहे, असा टोला पवार यांनी लगावला.

https://www.facebook.com/watch/?v=3244331062457347

वाढे ता. जि. सातारा येथील विकासकामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी भोंग्याच्या वादावरून अजित पवारांनी राज ठाकरेंवर पुन्हा तोफ डागली. यावेळी ते म्हणाले की, काही लोक पावसाळ्यातील छत्र्यांसारखे कधीतरी उगवतात. त्यांच्याकडून राजकीय स्वार्थासाठी धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे.

विष कालवणाऱ्या माणसाने काय काम केलं आहे? साधी दूध सोसायटी काढली नाही पठ्ठ्याने. एक खरबूज, टरबूज सोसायटीदेखील नाही. संस्था चालवायला डोकं लागतं. धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही” असे म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.

राज ठाकरेंचे जेवढे वय नाही तेवढे शरद पवारांचे राजकारण

यावेळी अजित पवार राज ठाकरे याच्यावर निशाणा साधत म्हणाले की, “राज ठाकरे यांचं जेवढं वय नाही तेवढं शरद पवारांनी राजकारण केलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी भोंगे बंद केल्याचं कौतुक राज ठाकरे करत आहेत. मात्र त्यांनी फक्त मशिदींवरचे नाही तर मंदिरांवरचे भोंगेही उतरवले आहेत हे लक्षात घ्या, असेही पवार यांनी म्हंटले.

नवनीत राणांनाही फटकारले

अमरावती खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची आव्हान दिल्यनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या नावावर सरकार बनवून दाखवलं आणि तुम्ही काय त्यांच्या गप्पा मारता असं म्हणत अजितदादांनी नवनीत राणा यांना फटकारले.

Leave a Comment