Investment Schemes For Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहेत ‘या’ योजना; मिळतात जबरदस्त फायदे

Investment Schemes For Senior Citizens
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Schemes For Senior Citizens) उतार वयाचा विचार करता वेळीच आर्थिक नियोजन करणे फार महत्वाचे असते. ज्यामुळे म्हातारपणातील आर्थिक गरजा कोणत्याही समस्येशिवाय पूर्ण करता येतात. मुख्य म्हणजे आर्थिक नियोजन करतेवेळी लक्षात घ्यायची महत्वाची बाब म्हणजे करबचत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कमी जोखीम आणि कर बचतीच्या उपायांमध्ये गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर आहे. मात्र, निवृत्तीनंतर तुमचे कर दायित्व कमी करण्यासाठी तुम्हाला काही सर्वोत्तम बचत पर्यायांची निवड करायला हवी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही लाभदायी योजनांची माहिती देत आहोत.

1) कर बचत मुदत ठेव (Tax Saving Fixed Deposit)

टॅक्स सेव्हिंग एफडीचा लॉक- इन कालावधी हा एकूण ५ वर्षांचा असतो. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर व्याजाच्या स्वरूपात चांगले उत्पन्न मिळते. (Investment Schemes For Senior Citizens) शिवाय आयकर कायदा कलम 80C अंतर्गत, या प्रकारच्या एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास कर बचत होते. यानुसार, १.५ लाख रुपयांपर्यंतचा टॅक्स वाचवता येतो. म्हणजेच, या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स बचतीसोबत चांगला परतावा मिळतो.

2) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund)

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पब्लिक प्रोविडेंट फंड ही भारत सरकारची अत्यंत सुरक्षित योजना आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंतची करबचत करू शकतात. या योजनेच्या मॅच्युरिटीचा कालावधी हा १५ वर्षांचा असतो. त्यामुळे हि योजना ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे.

3) करमुक्त बाँड (Tax Free Bond)

सार्वजनिक क्षेत्रात सरकारी कॉर्पोरेशन, महानगरपालिका आणि इतर इन्फ्रा कंपन्या या सरकारच्या वतीने बाँड जारी करणाऱ्या अधिकृत संस्था आहेत. या प्रकारात, बॉंड धारकांना दिलेले व्याज हे टॅक्स फ्री असल्यामुळे त्यांना निश्चित उत्पन्न गुंतवणूकीचा एक पर्याय प्राप्त होतो. त्यामुळे हा एक उत्तम आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. (Investment Schemes For Senior Citizens) यात गुंतवणूकदारांना दरवर्षी पूर्व-निर्धारित व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न प्रदान केले जाते. या योजनेच्या मुदतीवर, मूळ रक्कम परत केली जाते. असे बॉंड NHAI, REC आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) द्वारे जारी केले जातात.

4) इक्विटी लिंक्ड बचत योजना (Equity Linked Savings Scheme)

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा गुंतवणुकीचा एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. कारण, या योजनेंतर्गत उत्तम कर लाभ आणि मोठा परतावा मिळतो. आयकर कायदा कलम 80C अंतर्गत, या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना १.५ लाख रुपयांपर्यंत कर लाभ दिला जातो. या योजनेचा ३ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो.

(Investment Schemes For Senior Citizens)लक्षात घ्या, वर नमूद केलेल्या योजनांचा फायदा हा केवळ जुन्या कर प्रणाली अंतर्गत रिटर्न भरणाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ नव्या कर प्रणालीत समाविष्ट झालेल्यांना अजिबात मिळणार नाही.