Investment Tips : आपल्या मुलीच्या भविष्यासाठी अशा प्रकारे तयार करा 65 लाखांचा फंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips: आपल्या घरातही लहान मुलगी असेल तर तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैशांची गरज आता सहजपणे पूर्ण करता येऊ शकेल. यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करावी लागेल. हे लक्षात घ्या कि, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडता येते. याद्वारे दररोज 100 रुपयांची बचत करून 15 लाख रुपये तर दररोज 416 रुपयांची बचत करून 65 लाख रुपयांचा फंड जमा करता येईल. जो तिच्या चांगल्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल.

हे लक्षात घ्या कि, बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली, सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही केंद्र सरकारची मुलींसाठीची लहान बचत योजना आहे. लघु लहान योजनेमधील सुकन्या योजनेचा व्याजदर सर्वोत्तम आहे.

Sukanya Samriddhi Yojana

अशा प्रकारे उघडा खाते

या योजनेमध्ये कोणत्याही व्यक्तीला दोन मुलींसाठी खाते उघडता येते. तसेच या योजनेंतर्गत खाते 10 वर्षे वयाच्या आधी मुलीच्या जन्मानंतर 250 रुपयांच्या डिपॉझिट्सद्वारे उघडता येते. Investment Tips

खाते कुठे उघडावे ???

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा व्यावसायिक शाखेच्या अधिकृत शाखेमध्ये खाते उघडता येते. तसेच वयाच्या 21 व्या वर्षी मुलींना या खात्यातून पैसे काढता येतील. Investment Tips

Sukanya Samridhi Yojana Details

किती दिवस खाते चालू ठेवता येईल ???

सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यानंतर मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत ते सुरू ठेवता येईल. Investment Tips

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

अशा प्रकारे जमा करा 65 लाख रुपये

>> या योजनेत दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक करून 14 वर्षांनंतर वार्षिक 7.6% चक्रवाढ दराने 9,11,574 रुपये मिळतील.

>> 21 वर्षे म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये असेल. म्हणजेच, जर दररोज 100 रुपये जमा करून मुलीसाठी 15 लाख रुपयांचा फंड तयार करता येईल.

>> त्याच वेळी, दररोज 416 रुपयांची बचत करून 65 लाख रुपयांचा फंड तयार करता येईल. Investment Tips

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=89

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे नवीन व्याजदर
FD Rates : ‘या’ 2 बँकांनी FD वरील व्याजदरात केला बदल, जाणून घ्या नवीन व्याजदर
RBI ने लॉन्च केला Digital Rupee, जाणून घ्या कुठे खरेदी करता येईल ???
IDFC First Bank कडून एफडीवर मिळणार 7% पेक्षा जास्त व्याज, अशा प्रकारे करा गुंतवणूक
Financial Changes : आजपासून बदलले ‘हे’ 5 नियम, याचा आपल्यावर कसा परिणाम होईल ते पहा