हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Fund किंवा शेअर मार्केट मध्ये योग्य वेळी पैसे गुंतवणे जितके महत्त्वाचे असते तितकेच पैसे योग्य वेळी काढणे देखील असते. मात्र जर मार्केटमधून योग्य वेळी पैसे काढले गेले नाहीत तर नफा कमी होऊ शकेल. त्यामुळे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड होल्डिंगची योग्य वेळी विक्री करणे महत्त्वाचे आहे.
हे लक्षात घ्या कि, Mutual Fund मध्ये गुंतवलेले पैसे काढण्यासाठी बाजारातील परिस्थितीचा आधार कधीही घेऊ नये. आपण केलेल्या गुंतवणुकीद्वारे आपली आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य झाली तरच म्युच्युअल फंड युनिट्सची विक्री करावी, असे तज्ञ सांगतात. याशिवाय म्युच्युअल फंडातून बाहेर पडताना आणखी काही बाबी लक्षात घेऊनच बाहेर पडा असे तज्ञ म्हणतात.
खर्च जास्त असेल तर …
आपल्या Mutual Fund च्या रिटर्नचा आधार त्याच्या खर्चाच्या गुणोत्तरावर अवलंबून असतो. हे प्रमाण जितके जास्त असेल तितकाच रिटर्न देखील कमी असेल. जर आपल्या फंडाचे किंवा प्लॅनसाठीचे खर्चाचे प्रमाण त्याच्या श्रेणीतील इतर फंडांच्या तुलनेत खूप जास्त असेल तर नक्कीच फंडातून पैसे काढण्याचा विचार करावा.
कामगिरी सातत्याने खराब असेल तर …
जर आपला फंड सातत्याने त्याच्या श्रेणीतील इतर फंडांपेक्षा कमी रिटर्न देत असेल आणि त्याच्या बेंचमार्क किंवा इंडेक्स फंडापेक्षा कमी रिटर्न देत असेल तर तो काढायला हवा. यासाठी दोन, तीन आणि पाच वर्षांच्या रिटर्नची तुलना करून प्रतिस्पर्धी फंडापेक्षा सातत्याने कमी रिटर्न मिळत असेल ते विकण्याचा विचार करा. जर फंड नवीन असेल किंवा त्याची कामगिरी अल्पकालीन असेल तर अजिबात घाई करू नका. Mutual Fund
टार्गेट पूर्ण झाले तर …
ज्या उद्दिष्टासाठी आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती ते पूर्ण होत असेल तर म्युच्युअल फंडातून बाहेर पडावे. जर टार्गेट साध्य करण्यात 80-90 टक्के यश मिळवले असेल तर विक्री करू शकता, मात्र जर टार्गेट 50% लांब असेल तर घाई करू नका.
ओव्हरलॅप होत असेल तर …
बऱ्याचदा लोकं एकाच प्रकारच्या फंडात गुंतवणूक करतात, ज्यामुळे ओव्हरलॅपिंगचा धोका वाढतो. यासाठी वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्याचा विचार करावा. आपल्या पोर्टफोलिओमध्ये फक्त एकाच प्रकारच्चे प्लॅन्स असतील तर खराब कामगिरी करणार्या प्लॅन्सचे युनिट विकून दुसर्या प्लॅनमध्ये पैसे गुंतवावेत. Mutual Fund
फंडाच्या मूलभूत गुणधर्मांमध्ये बदल झाला तर …
फंडाच्या गुणधर्मामध्ये मूलभूत बदल होऊ शकतो, ज्यासाठी युनिटची विक्री करणे आवश्यक असू शकते. गुणधर्मातील बदलामुळे फंडाची गुंतवणूक कोणत्या मूळ कारणासाठी केली जाऊ शकते.
STP वापरा
आपण ज्यासाठी गुंतवणूक केली आहे ते टार्गेट जवळ येत असेल, तर आपण बाजारातील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून फंडाची विक्री करू शकता. मात्र जर उद्दिष्ट टाळता येत नसेल तर तुम्ही नियोजित वेळेच्या एक किंवा दोन वर्षे आधी ऍक्टिव्ह व्हावे. यासाठी तुम्हाला इक्विटी फंडातून पैसे काढून लिक्विड फंडात टाकावे लागतील. यासाठी आपल्याला ऑटोमेटेड सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (STP) वापरता येईल.
आपल्याला गरज आहे तितक्या युनिट्सची विक्री करा
कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात कधीही आणीबाणी येऊ शकते आणि त्याचा सामना करण्यासाठी एमर्जन्सी फंड असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याकडे असा फंड नसेल आणि दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसेल, तरच म्युच्युअल फंडाची विक्री करावी. मात्र शक्य असेल तर काही युनिट्स वाचवून गुंतवणूक सुरु ठेवा. Mutual Fund
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/mutual-fund/top-10-mutual-fund-plans-to-invest-in-india.html
हे पण वाचा :
Karnataka Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजात पुन्हा केली वाढ, नवीन दर तपासा
Ration Card आधारशी लिंक करण्याची आज शेवटची संधी, लिंक करण्याची प्रक्रिया तपासा
Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन दर पहा
सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे Gold Loan वर काय परिणाम होतो ??? जाणून घ्या