शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या महिन्यातच करावे ‘हे’ काम अन्यथा त्यांना ट्रेडिंग करता येणार नाही

Share Market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करणाऱ्यांना या महिन्याच्या आत आपले KYC अपडेट करावे लागेल. असे न केल्यास आपले डिमॅट खाते बंद केले जाईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी, लवकरात लवकर तुमचे डीमॅट खात्याचे KYC करा. यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) ने जवळपास महिनाभरापूर्वी KYC बाबत ऍडव्हायझरी जारी केली होती. BSE वेबसाइटवर अपलोड केलेल्या या ऍडव्हायझरी नुसार, डीमॅट खात्यात KYC अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 पर्यंत आहे. यासह, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मुदत संपण्यापूर्वी आपले डीमॅट खाते KYC करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. असे न केल्यास 31 मार्च 2022 नंतर KYC नसलेली डीमॅट खाती बंद केली जातील.

कोणती माहिती देणे आवश्यक आहे?
KYC करण्यासाठी, डिमॅट खातेधारकांना 6 महत्त्वाची माहिती शेअर करावी लागेल. यामध्ये तुमचे नाव, पॅन कार्ड क्रमांक, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि इनकम रेंज यांचा समावेश आहे. जे गुंतवणूकदार कस्टोडियन सर्व्हिस वापरत आहेत, त्यांनी देखील कस्टोडियन डिटेल्स देणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती अंतिम मुदतीपर्यंत अपडेट न केल्यास, गुंतवणूकदाराचे एक्सचेंज ट्रेड अकाउंट देखील सस्पेंड केले जाईल.

KYC कसे करावे ?
डीमॅट खात्याच्या KYC अपडेटसाठी गुंतवणूकदार स्टॉक ब्रोकरशी संपर्क साधू शकतात. ते डिपॉझिटरी पार्टिसिपंटद्वारे KYC अपडेट देखील मिळवू शकतात. गुंतवणूकदारांना डिपॉझिटरीज आणि एक्सचेंजेसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.