हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 13 Pro Max : Apple या कंपनीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. या कंपनीच्या iPhone ची चर्चा तर जगभरात होते. जेव्हा कधी याचे नवीन मॉडेल बाजारात दाखल होते. तेव्हा तो विकत घेण्यासाठी मोठंमोठ्या रांगा लागल्याचे दिसून येते. मात्र, या स्मार्टफोनची किंमत जास्त असल्याने अनेकांना तो खरेदी करता येत नाही.
जर किंमत जास्त असल्यामुळे आपण iPhone खरेदी करू शकत नसाल तर फेसबुकचे मार्केटप्लेस आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. हे लक्षात घ्या कि, इथे iPhone 13 Pro Max हा खूप स्वस्त किंमतींत उपलब्ध झाला आहे. इथे फक्त 14,000 रुपयांमध्ये तो खरेदी करता येऊ शकेल. iPhone 13 Pro Max
यामुळे स्वस्त आहे iPhone 13 Pro Max
हे लक्षात घ्या कि, फेसबुकवरील मार्केटप्लेसवर स्थानिक विक्रेत्यांकडून iPhone 13 Pro Max विकला जातो आहे. मात्र हे खरे मॉडेल नसून त्याला फेक आयफोन अथवा फर्स्ट कॉपी असे म्हंटले जाते. हा दिसायला जवळपास खऱ्या आयफोनसारखाच असतो, मात्र फिचर्सच्या बाबतीत तो खूपच वेगळा आहे.
फेसबुकवरील मार्केटप्लेसवर सध्या उपलब्ध असलेल्या iPhone 13 Pro Max ची किंमत ₹14000 ते ₹20000 च्या घरात आहे. ज्या लोकांना आपले मित्र आणि सहकाऱ्यांसमोर फक्त स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरायचा आहे अशी लोकं हे iPhone घेतात. मात्र हा फोन दिसायला अगदी iPhone सारखा हुबेहूब दिसत असला तरी त्याची खऱ्या आयफोनशी आयफोनशी तुलना करणे मूर्खपणाचेच ठरेल.
याशिवाय स्वस्तात आयफोन विकण्यामध्ये एखादा घोटाळा देखील असू शकेल. कारण याद्वारे आपले बँक खाते देखील रिकामे केले जाऊ शकते. त्यामुळे ऑनलाइन फोन खरेदी करताना जरा काळजी घ्या. तसेच जर आपल्याला एखादा चांगला फोन घ्यायचा असेल तर 20 हजार रुपयांच्या बजेटमधील दुसरा कुठलाही स्मार्टफोन घेणेच चांगले होईल. यामध्ये आपल्याला चांगले फीचर्स आणि दीर्घ काळ चालणार स्मार्टफोन मिळू शकेल. iPhone 13 Pro Max
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.facebook.com/marketplace/delhi/iphones/
हे पण वाचा :
New Business Idea : सतत मागणी असलेल्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये
Investment Tips : ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मुलांच्या भविष्यासाठी जमवा लाखो रुपये
Flipkart Sale मध्ये 1500 रुपयांपेक्षा कमी किंमतींत उपलब्ध आहेत ‘हे’ स्मार्टफोन
Business Idea : वर्षभर मागणी असणाऱ्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न !!!
Financial Changes : 1 फेब्रुवारी 2023 पासून ‘या’ नियमांत होणार बदल,याचा आपल्या खिशावर कसा परिणाम होईल ते पहा