iPhone 14 : स्वस्तात iPhone 14 खरेदी करण्याची सुवर्णसंधी! Flipkart सेलमध्ये मिळतोय बंपर डिस्काउंट; जाणून घ्या काय आहे ऑफर?

iPhone 14 offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

iPhone 14 : जर तुम्ही आयफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. iPhone 14 वर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे iPhone 14 अगदी कमी रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. या बंपर डिस्काउंटचा लाभ आपण कुठे घेऊ शकता, ते आपण जाणून घेऊया पुढीलप्रमाणे…

15 जुलैपासून सुरू होणाऱ्या अॅमेझॉनचा Amazon Prime Day आणि फ्लिपकार्टचा Flipkart Big Saving Days सेलमध्ये तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये आयफोन 14 अतिशय कमी किमतीत मिळेल. Amazon ने आयफोन 14 वर उपलब्ध असलेल्या ऑफरचा खुलासा केला आहे. तुम्ही हा फोन प्राइम डे सेलमधून फक्त रु. 66,499 मध्ये खरेदी करू शकाल. त्याचबरोबर फ्लिपकार्ट हा फोन सवलतीत विकणार आहे.

iPhone 14 स्वस्तात मिळणार आहे – iPhone 14

कंपनीने त्याचा टीझर टाकला आहे. बिग सेव्हिंग डेज सेलसह, तुम्ही केवळ iPhone 14 च नाही तर iPhone 13 आणि आयफोन 14  Plus देखील स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीने सेलचे टीझर पेज लाईव्ह केले आहे. या टीझर पेजवर स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स दाखवण्यात आल्या आहेत.

सध्या आयफोन 14 अॅपलच्या अधिकृत साइटवर 79,990 रुपयांना उपलब्ध आहे. तथापि, फ्लिपकार्टवर आयफोन 14 Mobile 70,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत फोनच्या 128GB स्टोरेज वेरिएंटची आहे. यामध्ये HDFC बँकेच्या कार्डांवर 4,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. यानंतर फोनची किंमत 66,999 रुपये होईल. कंपनी लवकरच त्यावर उपलब्ध असलेल्या सेल ऑफरचा खुलासा करेल. यानंतर तुम्ही iPhone 14 आणखी स्वस्तात खरेदी करू शकाल. फ्लिपकार्ट सेल 15 जुलै ते 19 जुलै पर्यंत सुरू राहणार आहे.

सवलत आधीच उपलब्ध होती –

यापूर्वी, कंपनीने मे सेलमध्ये आयफोन 14 सवलतीत विकला होता. त्यावेळी फोनची किंमत 67,999 रुपयांवर पोहोचली होती. त्यावेळी कंपनीने हा फोन जवळपास 12,000 रुपयांच्या सवलतीत विकला. यावेळी कंपनी 65 हजार रुपयांपर्यंत फोन विकू शकते अशी अपेक्षा केली जात आहे. तथापि, त्यात बँक ऑफर आणि इतर फायदे देखील असतील.

iPhone 14 वैशिष्ट्ये –

या फोनमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले उपलब्ध आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 12MP वाइड अँगल आणि 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स उपलब्ध आहेत. याशिवाय कंपनीने 12MP सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. डिव्हाइस A15 बायोनिक चिपसेटवर काम करते.