हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Valentine’s Day Sale : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Apple कडून आपली बहुचर्चित iPhone 14 सिरीज लाँच करण्यात आली. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांसारख्या प्रिमियम मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात या सिरीजच्या फोनची सुरुवातीची किंमत 79,900 रुपयांपासून ठेवण्यात आली आहे. आता Valentine’s Day च्या निमित्ताने सुरू झालेल्या एका ऑनलाइन सेलमध्ये iPhone 14 सीरिजच्या फोन्सवर ग्राहकांना जबरदस्त डिस्काउंट दिला जातो आहे. चला तर मग या ऑफर्सविषयीची सर्व माहिती जाणून घेउयात…
Apple-चे भारतातील सर्वात मोठे अधिकृत थर्ड पार्टी सेलर्सपैकी Imagine हे एक रिटेल विक्रेते आहेत. ज्यांच्याकडून व्हॅलेंटाईन डे सेल अंतर्गत iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर कार्ड कॅशबॅक, डिस्काउंट आणि एक्सचेंज सारख्या जबरदस्त ऑफर दिल्या जात आहेत. Valentine’s Day Sale
iPhone 14, 14 प्लस साठीची व्हॅलेंटाईन डे ऑफर काय आहे ते जाणून घ्या
हे जाणून घ्या कि, भारतात 128GB स्टोरेज असलेला iPhone 14 हा 79,900 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना 256GB आणि 512GB स्टोरेजचा पर्याय देखील मिळतो. ज्यांची किंमत अनुक्रमे 89,900 रुपये आणि 1,09,900 रुपये आहे. Valentine’s Day Sale
Imagine च्या सेल ऑफर अंतर्गत, ग्राहकांना iPhone 14 वर 6,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल. तसेच HDFC बँकेच्या कार्डधारकांना 4,000 रुपयांच्या कॅशबॅकसहीत हा फोन घेता येऊ शकेल. या डिस्काउंटनंतर, iPhone 14 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय, एक ट्रेड-इन ऑफर अंतर्गत जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात iPhone 14 च्या खरेदीवर 20,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, प्रत्येक स्मार्टफोनच्या अवस्थेनुसार त्याच्या एक्सचेंजची किंमत वेगवेळी असेल. Valentine’s Day Sale
Imagine च्या सेल ऑफर अंतर्गत, ग्राहकांना iPhone 14 Plus वर देखील चांगला डिस्काउंट मिळेल. HDFC बँकेच्या कार्डांवर 4,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल. याशिवाय EasyEMI ट्रान्सझॅक्शनवरही कॅशबॅक ऑफरचा मिळू शकेल. या ऑफरनंतर, iPhone 14 Plus 78,900 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
iPhone 14, iPhone 14 Plus फीचर्स तपासा
iPhone 14 च्या दोन्ही व्हेरिएन्टमध्ये 12-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जो सेन्सर-शिफ्ट स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करेल. या फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि सेल्फीसाठी 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे, जो ऑटोफोकसला सपोर्ट करेल. यासोबतच यामध्ये iOS 16 ऑपरेटिंग सिस्टीम देखील दिली गेली आहे. Valentine’s Day Sale
iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या डिस्प्लेवर फ्रंट कॅमेरासाठी नॉच देखील उपलब्ध आहे. तसेच, iPhone 14 Plus मध्ये 6.7 इंच डिस्प्ले उपलब्ध आहे. या दोन्ही iPhone मॉडेल्समध्ये 60 Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. आयफोनच्या या नॉन-प्रो मोड्समध्ये A15 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. या दोन्ही फोन्समध्ये 20W फास्ट चार्जिंग आणि 7.5W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://imaginestore.org/valentinesday-offer-2022/
हे पण वाचा :
‘या’ LIC योजनेत दररोज 58 रुपयांची बचत करून मिळवा 8 लाख रुपये !!!
PAN-Aadhaar Link : ‘या’ तारखेपर्यंत पॅन आधारशी करा लिंक, अन्यथा करावा लागेल अडचणींचा सामना
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Blue Economy म्हणजे काय ? याद्वारे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न कसे मिळू शकेल ते पहा
Bank FD : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 9% पर्यंत व्याज