फक्त 13000 रुपयांत मिळतोय iPhone 15; पहा कुठे आहे ऑफर??

iPhone 15 Flipkart Offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात iPhone वापरणारा एक वेगळाच वर्ग आहे. iPhone हातात असला कि माणसाला वेगळंच इम्प्रेशन पडतंय, त्यामुळे अनेकजण iPhone घेण्याकडे पसंती दाखवतात. परंत्तू किमतीने महागडा असणारा iPhone सर्वसामान्याना परवडत नाही. पण नव्या वर्षात फक्त 13000 रुपयांत iPhone मिळतोय असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर?? विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल आयोजित करण्यात आलाय. या सेलच्या माध्यमातून तुम्ही iPhone 15 अवघ्या 13000 रुपयांत खरेदी करू शकता. हि ऑफर नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात….

पहा काय आहे ऑफर??

Flipkart च्या रिपब्लिक डे सेलमध्ये iPhone 15 ची मूळ किंमत 74,999 ठेवली आहे. मात्र तुम्ही हा मोबाईल HDFC कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास तुम्हाला 4000 रुपयांची सूट मिळेल.म्हणजे त्याची किंमत 70,999 रुपयांपर्यंत खाली येतेय. परंतु तुम्ही जर तुमचा जुना मोबाईल एक्सचेंज करायचा म्हंटलं तर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत तब्बल 57,990 पर्यंत सूट देण्यात येत आहे. म्हणजेच तुम्ही अवघ्या 13,009 रुपयांत नवा कोरा iPhone 15 खरेदी करू शकता. परंतु मोबाईलच्या कंडिशनवर एक्सचेंज ऑफरची किंमत ठरवली जाईल हे इथे लक्षात घ्या ….

iPhone 15 चे फीचर्स –

iPhone 15 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने A16 Bionic चिपसेट बसवली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर दिवसभर तुम्हाला काय टेन्शन नाही. डिझाईन सुद्धा अतिशय छान आहे, चारही बाजूला कर्व्ह कॉर्नर आहेत. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, iPhone 15 मध्ये 48MP प्राथमिक कॅमेरा आणि 12MP चा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. अतिशय मोठ्या अशा कॅमेरा लेन्स वापरण्यात आल्या आहेत. मोबाईलच्या खालच्या बाजूला USB-C कनेक्टर जोडण्यात आलाय.