मुंबई । देशातल्या कोरोना संकटामुळं आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन रखडला आहे. यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय प्रत्येक पर्यायांवर विचार करत आहे. यात आयपीएल स्पर्धा भारताबाहेर भरवण्यावर एकमत होताना दिसत आहे. त्यानुसार आयपीएलच्या १३ वा हंगाम युएईत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारकडून अधिकृत परवानगी आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने अधिकृत भूमिका जाहीर केल्यानंतर बीसीसीआय आयपीएलबद्दल आपली घोषणा करणार असल्याचं कळतं आहे.
दरम्यान, शुक्रवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ कार्यकारणीची बैठक झाली, त्यात या निर्णयावर एकमत झाल्याचं कळतंय. आयसीसीने टी-२० विश्वचषक रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर, बीसीसीआय भारत सरकारकडे आयपीएल भारतात आयोजन करण्याबाबत परवानगी मागेल. पण देशातली परिस्थिती तोपर्यंत सुधारलेली नसेल तर यंदाची स्पर्धा ही युएईमध्ये खेळवली जाईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”