हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२१ स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. मागील सामन्यात चेन्नई विरुद्ध मुंबईला पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे आता आज कोलकात्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणे हेच मुंबईचे लक्ष्य असेल. तर दुसरीकडे कोलकाताने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ९ गडी राखून दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे कर्णधार आयन मॉर्गनचे जबरदस्त नेतृत्त्व , नवोदित युवा सलामीवीर, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण सारखे स्पेशालिस्ट अष्टपैलू खेळाडू हि कोलकात्याची ताकद असून मागील सामन्यात त्यांनी विराट कोहलीच्या बंगळुरूला अस्मान दाखवले.
तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माची दुखापत हे मुंबई इंडियन्स साठी चांगली गोष्ट नाही. मागच्या सामन्यात रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या व्यतिरिक्त खेळला होता. दुखापतीमुळे या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. आजच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत अजूनही शंका आहे. मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहित शर्मा या सामन्यात खेळेल असे संकेत दिले होते.
मुंबई आणि कोलकाता संघात आतापर्यंत २८ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी २२ सामन्यात मुंबईने, तर ६ सामन्यात कोलकात्याने विजय मिळवला आहे. २०२० मध्ये आबुधाबीत झालेल्या स्पर्धेत एकूण ३ सामने पार पडले होते. त्यापैकी २ सामन्यात मुंबईत, तर एका सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे.