हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाने टीमच्या नावात बदल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी आपली जर्सीदेखील बदलली आहे. एवढं सगळं बदललं पण संघाचा खेळ काही बदलेला नाही. यंदाच्या मोसमात पंजाबने ३ पैकी २ सामने गमावले आहेत. तर आजच्या सामन्यात देखील त्यांची बिकट अवस्था झाली आहे. यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज निकोलस पूरन पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन याची प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा विस्फोटक फलंदाज अशी ओळख आहे. पण आताच्या मोसमामध्ये निकोलस पूरनला धावांसाठी झगडावे लागत आहे. ह्या आयपीएलमध्ये निकोलस पूरन ४ सामन्यांत ३ वेळा झाला शून्यावर बाद झाला आहे. २५ वर्षीय निकोलस पूरन याला मागच्या वर्षी पंजाबने ४ कोटी २० लाख रुपयांची बोली लावून आपल्याकडे घेतले होते. ह्या मोसमात पंजाबचे फलंदाज अपयशी ठरत आहेत.
निकोलस पूरन याने ४ सामन्यांमध्ये फक्त ९ धावाच केल्या आहेत. आणि यामध्ये महत्वाचे म्हणजे यामधील ३ सामन्यांत त्याला भोपळाही फोडता आला नाही. या आयपीएलमध्ये राजस्थानच्या ख्रिस मॉरिस, चेन्नई सुपरकिंग्जच्या दिपक चहरने, दिल्ली कॅपिटल्सच्या आवेश खानने या गोलंदाजांनी निकलोस पूरनला बाद केले आहे. आजच्या सामन्यात तर निकलोस पूरन एकही बॉल न खेळता डेव्हिड वॉर्नरच्या जबरदस्त डायरेक्ट हीटवर रन आऊट झाला.