हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात सध्या पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा सामना सनरायझर्स हैदराबाद खूप महत्वाचा आहे. यासामन्यामध्ये हैदराबादच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखत पंजाबच्या ४ फलंदाजाना अवघ्या ४७ धावांत माघारी पाठवले आहे. पण या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुल याने मोठा विक्रम आपल्या नावावर करताना विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा या सर्वांना मागे टाकले आहे.
या सामन्यांमध्ये लोकेश राहुलला फक्त ४ धावाच करता आल्या. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने लोकेश राहुल बाद केले. पण या सामन्यात राहुलने ४ धावा करत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. लोकेश राहुलने त्या ४ धावांसह टी -२० मध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला आहे. राहुलने टी- २० मध्ये सर्वात जलद ५००० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे.
सर्वात जलद ५००० धावा करणारे भारतीय फलंदाज ( डाव)
लोकेश राहुल – १४३
विराट कोहली – १६७
सुरेश रैना – १७३
शिखर धवन – १८१
रोहित शर्मा – १८८
जगातील फलंदाज जलद ५००० धावा करणारे ( डाव)
ख्रिस गेल ( १३२)
लोकेश राहुल ( १४३)
शॉन मार्श ( १४४)
बाबर आजम ( १४५)
अॅरोन फिंच ( १५९)
आजच्या सामन्याचा संघ पुढीलप्रमाणे
पंजाब किंग्ज (Punjab Kings) – मयांक अग्रवाल, केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पुरन, शाहरुख खान, एम हेन्रीकस, फॅबियन एलन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, विजय शंकर, विराट सिंग, केदार जाधव, अभिषेक शर्मा, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद.