हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर याला दुखापत झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली. आणि ऋषभ पंत ती उत्तम पद्दतीने पार पाडत आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.
ऋषभ पंतने सनरायझर्स हैदराबादच्या विरोधात ३७ धावांची खेळी करून त्याने दिल्लीच्या संघाकडून एक इतिहास रचला आहे. ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. दिल्लीच्या श्रेयस अय्यरला मागे टाकत त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे यंदाची आयपीएल खेळू शकणार नाही.
श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना २२०० धावा केल्या आहेत. ऋषभ पंत हा २०१६ पासून दिल्लीच्या संघाकडून खेळत आहे. यामध्ये त्याने श्रेयस अय्यरला मागे टाकत दिल्ली कॅपिटल्सकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत २२०४ धावा केल्यात आहेत त्यामध्ये १३ अर्धशतकांचा तर एका शतकाचा समावेश आहे.