मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काल मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा (IPL 2022) महत्वपूर्ण सामना झाला. या सामन्यात मुंबईचा 3 धावांनी पराभव झाला. कालच्या सामन्यात रोहितने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईने टीममध्ये दोन बदल करत मयंक मार्कंडे आणि संजय यादव यांना संधी दिली. तर कुमार कार्तिकेय आणि ऋतीक शौकीन यांना बाहेर करण्यात आले. टॉसच्यावेळी कॉमेंटेटर इयन बिशप यांनी रोहितला ‘मुंबई आता प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकत नाही, त्यामुळे वर्कलोड बघता तू आणि बुमराह प्लेयिंग इलेव्हनच्या बाहेर का बसत नाही?’, असे विचारले.
त्यावर उत्तर देताना रोहित म्हणाला ‘टीमचा कोर ग्रुप वारंवार खेळत राहावा, हे गरजेचं आहे. टीम म्हणून आम्हाला काही गोष्टींसोबत पुढे जावं लागतं. काही खेळाडूंना आराम दिला जावा, याचा विचार आम्ही नक्कीच केला होता.’ मुंबई इंडियन्सने ह्या सीझनमध्ये तब्बल 22 खेळाडूंना संधी दिली. राहुल बुद्धी, आर्यन जुयाल आणि अर्जुन तेंडुलकर हे तीनच खेळाडू मुंबईकडून खेळायचे बाकी आहेत. तसेच शेवटच्या सामन्यात आणखी काही नव्या खेळाडूंना संधी मिळेल, असे संकेत रोहित शर्माने टॉसवेळी दिले आहेत. त्यामुळे आता अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल (IPL 2022) पदार्पणाची आशा वाढली आहे.
रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे सीनियर आणि महत्त्वाचे खेळाडू आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आणि बुमराह उपकर्णधार आहे. हे दोन्ही खेळाडू लगातार क्रिकेट खेळत आहेत. आयपीएल 2022 नंतर लगेचच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 टी-20 मॅचची सीरिज आणि मग इंग्लंड दौरा होणार आहे. या खेळाडूंवरचा वर्कलोडचा ताण बघता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि विराट कोहली या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :
आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या
KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर
NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक
एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल