मोठी बातमी!! ‘या’ तारखेला सुरू होणार आयपीएल 2022

IPL
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली इंडिअन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी खेळवण्यात येईल. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आयपीएलचे आयोजन हे महाराष्ट्रात होणार आहे. मुंबईत 55 आणि पुण्यात 15 सामने होतील. लीगचे सर्व सामने चार स्टेडियममध्ये खेळवले जातील. वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर 20 सामने, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15 सामने आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 15 सामने होणार आहेत.

दरम्यान, यंदाचे आयपीएल सामने हे रिकाम्या स्टेडियममध्ये होणार नाहीत. म्हणजेच सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल. साखळी फेरीदरम्यान त्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार घेतला जाईल. स्टेडियममध्ये किमान २५ किंवा ५० टक्के प्रेक्षक उपस्थित असतील