मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2023चे मिनी ऑक्शन लवकरच सुरु होणार आहे. आयपीएलमधील दहा फ्रेंचायजींनी ऑक्शनची रणनिती आखली आहे. या ऑक्शनमध्ये सर्वात जास्त मागणी ऑलराऊंडर्स खेळाडूंना असणार आहे. यामध्ये बेन स्टोक्स, सॅम करन (Sam Curran), कॅमरुन ग्रीन या खेळाडूंवर सर्वात जास्त बोली लागण्याची शक्यता आहे. मागच्या सीजनमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने खूपच सुमार कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये मोठी सुधारणा घडवून आणण्याच त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. हा लिलाव 23 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जची एका खेळाडूवर विशेष नजर असणार आहे. त्या खेळाडूचे नाव आहे सॅम करन (Sam Curran). सॅम करनला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज त्याच्यावर मोठी बोली लावण्याची शक्यता आहे.
बोली लावताना मागे-पुढे पाहू नका
सॅम करन (Sam Curran) मागच्या आयपीएलमध्ये खेळला नव्हता. पण आता येणाऱ्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जची टीम त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ताफ्यात घेण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्जची टीम ड्वेयन ब्राव्होच्या जागी त्याला आपल्या ताफ्यात घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार धोनीने टीम मॅनेजमेंटला सॅम करनवर बोली लावताना मागे-पुढे पाहू नका असे निर्देश दिले आहेत.
डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करु शकतो
सॅम करन चेन्नई सुपर किंग्जसाठी अजिबात नवीन नाही आहे. 2020 आणि 2021 च्या सीजनमध्ये तो चेन्नईकडून खेळला आहे. सॅम करन (Sam Curran) डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करु शकतो. त्याशिवाय लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करु शकतो” यामुळे चेन्नई त्याला आपल्या ताफ्यात घ्यायला उत्सुक आहे.
टी 20 वर्ल्ड कप विजयात त्याची महत्त्वाची भूमिका
2020 मध्ये सीएसकेने सॅम करनला (Sam Curran) 5.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. त्यानंतर त्याला टीममधून रिलीज करण्यात आले. मात्र त्याचा सध्याचा फॉर्म बघता सीएसके त्याला पुन्हा आपल्या ताफ्यात घेणार आहे. नुकत्याच संपलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता.
हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट