हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची 22 मार्चपासून ते मे अखेरपर्यंतची विंडो निश्चित केली आहे. त्यानुसार, आयपीएल 22 मार्चपासून होणार असल्याची दाट शक्यता आहे . अद्याप आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. तसेच वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कारण पुढील वर्षी देशामध्ये लोकसभा निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकांच्या परिणाम आयपीएलवर देखील होणार आहे. ज्यामुळेच अजूनही आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
परंतु सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्यास 22 मार्चला आयपीएल सुरुवात होईल. याबाबतची माहिती क्रिकबजच्या वृत्तामध्ये देण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने आयपीएल 2024 साठी विंडो निश्चित केली आहे. याबरोबरच परदेशी खेळाडूंच्या उपलब्ध संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, जोश हेझलवूड वगळता बहुतेक ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध राहणार आहेत. तसेच, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे खेळाडू देखील उपलब्ध राहतील.
दरम्यान, 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये आयपीएल 2024 चा लिलाव होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी केली आहे. यंदा आयपीएल लिलावामध्ये 333 खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यातील 10 संघ आणि 77 खेळाडू खरेदी केले जाऊ शकतात. तसेच, परदेशी खेळाडूंसाठी ३० स्लॉट ठेवले आहेत. या सर्व खेळाडूंवर सुमारे 263 खर्च करण्यात येणार आहे.