IPL 2024 Schedule | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आक (BCCI) IPL 2024 चे अधिकृत पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. देशातील लोकसभा निवडणुकांमुळे BCCI ने सुरुवातीला फक्त पहिल्या दोन आठवड्यांसाठीचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु आता IPL2024 सामने चांगलेच रंगले असताना BCCI कडून दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार आयपीएलचा अंतिम सामना 26 मे 2024 रोजी चेन्नईला खेळला जाणार आहे. (IPL 2024 Schedule)
त्याचबरोबर, प्ले ऑफमधील पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी होणार आहे. 22 मे 2024 ला एलिमिनेटर सामना अहमदाबादला होईल. 24 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामनाही चेन्नईला खेळवला जाईल. विशेष म्हणजे, यंदा साखळी फेरीत 70 सामने, प्लेऑफचे 4 सामने असे एकूण 74 सामने खेळवले जातील. सुरुवातील BCCI ने पहिल्या हंगामातील सामन्यांचे वेळापत्रक 22 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे पूर्ण वेळापत्रक जाहीर होण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज अंतिम वेळापत्रक जाहीर (IPL 2024 Schedule) झाल्यामुळे अंतिम सामना कधी रंगला जाईल हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुका आणि आयपीएल एकाच टप्प्यात आल्यामुळे आयपीएलचे शेड्युल मागेपुढे होईल, किंवा आयपीएलच्या तारखा पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु BCCI ने आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करून चहात्यांना गुड न्यूज दिली. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये मैदानात उतरलेला प्रत्येक संघ जिंकण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. यातच आता BCCI ने दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक ही जाहीर (IPL 2024 Schedule) केल्यामुळे अंतिम सामन्याबाबतची उत्सुकता आणखीन वाढली आहे.