IPL 2024 : देशातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या IPL 2024 कडे क्रिकेटप्रेमी मोठ्या उत्साहाने पाहत आहेत. BCCI ने अजूनही यंदाच्या आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. परंतु लवकरच ते जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतात याच वर्षी लोकसभा निवडणुका होणार असून मार्च- एप्रिल मध्येच यासाठी मतदान सुद्धा पार पडणार आहे. अशावेळी यंदाची आयपीएल स्पर्धा 2 टप्प्यात होऊ शकते. रिपोर्टनुसार अशी माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग केव्हाही जाहीर करू शकते. एकदा का मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या कि मग देशभरात आचारसंहिता लागू होईल. निवडणुकीच्या कालखंडात कडक सुरक्षा व्यवस्था संपूर्ण देशात तैनात असेल. अशावेळी आयपीएल स्पर्धा (IPL 2024) घेतल्यास सुरक्षा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी आयपीएल आणि लोकसभा निवडणूक घेणं वाटतं तेवढं सोप्प नसेल. हीच गोष्ट लक्षात ठेऊन बीसीसीआय यंदाची आयपीएल 2 टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकते. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र रिपोर्ट्सनुसार असं होऊ शकते.
कधी असेल पहिला आणि दुसरा टप्पा – IPL 2024
यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा एप्रिलच्या मध्यापर्यंत पूर्ण होऊ शकतो. त्यानंतर संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. लोकसभेसाठी एकूण ७ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजला रवाना होईल. त्यानंतर विश्वचषकानंतर आयपीएलचा दुसरा टप्पा जुलैमध्ये सुरु होऊ शकतो असं म्हंटल जात आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आयपीएल स्पर्धा दुसऱ्या देशात हलवण्यात आली होती. आता मात्र काहीतरी मार्ग काढून देशातच हि स्पर्धा खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.