IPL 2024 : या तारखेपासून सुरु होणार IPL चा रणसंग्राम!! अध्यक्षांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IPL 2024 : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. यंदाच्या IPL २०२४ च्या वेळापत्रकाबाबत सर्वात मोठे अपडेट समोर आले आहेत. देशात यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने IPL सामने भारतात होणार कि अन्य देशात खेळवण्यात येणार याबाबत चर्चा सुरु होत्या. अखेर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी यावर पडदा टाकत यंदाचे आयपीएलचे सर्व सामने भारतातच होणार आहेत अशी घोषणा केली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर झाल्या नसल्याने आयपीएलचे वेळापत्रक सुद्धा अजून घोषित करण्यात आलेले नाही असं त्यांनी म्हंटल.

आयपीएलची सुरुवात 22 मार्चपासून – IPL 2024

अरुण धुमल म्हणाले, IPL 2024 स्पर्धा य़ेत्या २२ मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र सुरुवातीला या स्पर्धेचे पहिल्या १५ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. आयपीएलची सुरुवात २२ मार्चपासून करण्याचा आमचा विचार आहे. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या तारखांकडे लक्ष ठेवत आहोत. मात्र काहीही झालं तरी आयपीएल भारतातच होईल अशी माहिती अरुण धुमल यांनी दिली.

यापूर्वी 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा संपूर्ण हंगाम दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता तर 2014 मध्ये आयपीएलचे काही सामने भारतात खेळवण्यात आले तर काही सामने यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मात्र संपूर्ण आयपीएल भारतातच खेळवण्यात आली होती, आणि आताही ही स्पर्धा भारतातच होणार असल्याने देशातील क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.