मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बेबी एबी डीव्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा अंडर 19चा खेळाडू आहे. त्याने यंदाच्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटिंगने सर्वांना आकर्षित केले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्यावर 3 कोटी रुपये खर्च करून आपल्या टीममध्ये सामावून घेतले आहे.
डेवाल्ड ब्रेविस याची कारकीर्द
काहीच दिवसांपूर्वी झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये डेवाल्ड ब्रेविसने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने 6 सामन्यांमध्ये 90.20 च्या सरासरीने 506 रन केले होते. भारताविरुद्ध त्याने 65 रनची खेळी केली होती. यानंतर दोन ग्रुप मॅचमध्ये त्याने 104 आणि 96 रनांची खेळी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये डेवाल्ड ब्रेविसने 97 रनची खेळी केली होती.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन एबी डीव्हिलियर्सने मागच्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर डेवाल्ड ब्रेविस त्याची कमतरता भरून काढेल असे दक्षिण आफ्रिकेच्या फॅन्सना वाटत आहे. महत्वाचे म्हणजे डेवाल्ड ब्रेविस एबी डिव्हिलियर्ससारखीच 360 डिग्रीमध्ये बॅटिंग करतो, त्यामुळे त्याला बेबी डिव्हिलियर्स असे टोपण नाव ठेवण्यात आले आहे. एवढच नाही तर तो एबी डिव्हिलियर्ससारखीच 17 नंबरची जर्सी घालतो. डेवाल्ड ब्रेविस जेव्हा एबी डिव्हिलियर्सला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा त्याने 17 नंबरची जर्सी घालण्याची परवानगी त्याच्याकडे मागितली होती. एबी डिव्हिलियर्सने जेव्हा परवानगी दिली तेव्हा त्याने ही जर्सी घालण्यास सुरूवात केली.