हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या सगळीकडे आयपीएल 2021 ची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्व संघांनी आयपीएलची तयारी देखील सुरू केली आहे. परंतु आता धक्कादायक माहिती समोर येत असून दिल्ली कॅपिटल संघाचा मुख्य खेळाडू अष्टपैलू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दिल्लीच्या संघाला हा जोरदार झटका बसला आहे.
अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने काही दिवसांपुर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. आयपीएल २०२० मध्येही आपल्या दिल्ली संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोवण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता.
IPL 2021: Big blow for DC as Axar Patel tests positive for COVID-19
Read @ANI Story | https://t.co/SLg4MTcZBt pic.twitter.com/Y1y8U426W3
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2021
आयपीएल २०२० मध्येही आपल्या दिल्ली संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोवण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे अक्षर कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने दिल्ली संघाची चिंता वाढली आहे. अक्षरपुर्वी कर्णधार श्रेयस अय्यरच्या रुपात दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group