IPL 2021: चेन्नई- कोलकातामध्ये महासंग्राम; कोण जिंकणार आयपीएल ट्रॉफी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आयपीएल 2021 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार असून आयपीएल चषक जिंकण्यासाठी दोन्ही संघांना आपला दमदार खेळ दाखवावा लागेल. यापूर्वी चेन्नईने 3 वेळा तर कोलकाताने 2 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने क्वालिफायर मध्ये दिल्लीला हरवून अंतिम फेरीत धडक मारली. आक्रमक युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसी, यांची सलामी चेन्नईसाठी आत्तापर्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. तसेच दिल्ली विरुद्धच्या सामन्यात धोनीने अंतिम ओव्हर मध्ये केलेल्या दमदार खेळीने चेन्नईला नवं बळ मिळाले आहे. रवींद्र जडेजा, ब्रावो, मोईन अली अशी दमदार अष्टपैलू खेळाडूंची फौज चेन्नईकडे आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोलकाताला विजय मिळवण्यासाठी झगडावे लागेल.

तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल मध्ये जोरदार मुसंडी मारत अंतिम फेरी गाठली आहे. प्रथम रॉयल चॅलेंजर बंगळुरु आणि नंतर दिल्लीचा पराभव करत कोलकात्याच्या संघाने थेट चेन्नईला आव्हान दिले आहे. सुनील नारायणचा परतलेला फॉर्म, युवा सलामीवीर व्यंकटेश अय्यरची धडाकेबाज खेळी, आणि दमदार फिरकीपटू ही कोलकात्याची ताकद मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही संघात हाय व्होल्टेज सामना होणार हे मात्र नक्की