हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. गतवर्षी देखील कोरोना मुळे यूएईमध्ये आयपीएल खेळवण्यात आली होती.
IPL has been moved to UAE for this season: Vice-President BCCI Rajeev Shukla to ANI pic.twitter.com/wqEukw6KGP
— ANI (@ANI) May 29, 2021
यंदाची आयपीएल भारतातच खेळवण्यात आली होती. पण काही खेळाडूंना स्पर्धा सुरू असतानाच कोरोनाची बाधा झाल्याने आयपीएल काही काळासाठी तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. पण आता ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर क्रिकेट प्रेमीसाठी हा आनंदाचा क्षण आहे.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल बाबत माहिती देताना म्हंटल होत की आयपीएल भारतात होणार नाही हे नक्की. त्यानंतर इंग्लंड आणि युएइ मध्ये आयपीएलच्या यजमान पदासाठी चुरस लागली होती. अखेर गतवर्षी प्रमाणे युएई मधेच आयपीएल सामने खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.