IPO: आज कमाईची आणखी एक संधी उघडली, त्यासाठी गुंतवणूकदारांनी काय करावे हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जानेवारी 2021 चा तिसरा आयपीओ आज लाँच झाला आहे. जर तुम्हीही बाजारातून पैसे कमविण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. होम फर्स्ट फायनान्स कंपनीचा आयपीओ 21 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान सब्सक्रिप्शन साठी खुला असेल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 1154 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली आहे. यामध्ये 265 कोटी किंमतीचे नवीन शेअर्स जाहीर करण्यात आले आहेत. त्याशिवाय ऑफर फॉर सेल (OFS) च्या माध्यमातून 888.72 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करण्यात आले आहेत.

आयपीओ बद्दल महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या-

> कंपनीने या आयपीओसाठी प्रति शेअर 517-518 रुपये निश्चित केले आहेत.
> कंपनीने आपले लॉट साइज 28 शेअर्स ठेवले आहेत.
> कंपनीने शेअर्सची इश्यू प्राईस प्रति शेअर 517-518 रुपये निश्चित केली आहे.
> हा आयपीओ 21 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान सब्सक्रिप्शन साठी खुला असेल.

गुंतवणूकदारांनी काय करावे हे जाणून घ्या ?
मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार सर्व ब्रोकरेज हाउसेसना या कंपनीच्या आयपीओला सब्सक्राइब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ब्रोकरेज हाऊसेसचा असा विश्वास आहे की, कंपनीची आर्थिक स्थिती खूप मजबूत आहे. या व्यतिरिक्त स्टेबल एसेट क्वालिटी, हेल्दी रिटर्न रेशो आणि पुरेसे भांडवल यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो.

ब्रोकरेज फर्म Yes Securities चे म्हणणे आहे की, कंपनीची हायग्रोथ मूमेंटम आणि सक्षम कलेक्शन मॅनेजमेंटमुळे त्याची एकूण NPA 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्याचबरोबर कंपनीच्या एसेट्सनी चांगला परतावा दिला असून तो आर्थिक वर्षात 2.7 टक्के आहे. याखेरीज इक्विटीवर साधारण 11 टक्के परतावा दिला आहे.

मनी कंट्रोलनुसार, Yes Securities ने गुंतवणूकदारांना या आयपीओला सब्सक्राइब करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी, LKP Securities ने देखील कंपनीचे मजबूत रिटर्न ऑन एसेट्स (ROA) आणि रिटर्न ऑन इक्विटीज (ROE) पाहून त्यांना सब्सक्राइब करण्याचा सल्ला दिला आहे.

कंपनी बद्दल जाणून घ्या-

> कंपनीची सुरूवात 2010 मध्ये झाली होती.
> अफोर्डेबल हाऊसिंग ही अशी कंपनी आहे जी पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार घर देईल.
> घर खरेदी करण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी हाऊसिंग लोन देखील उपलब्ध आहे.
> कंपनीचा नेट प्रॉफिट 122.6% CAGR झाला आहे.
> कंपनीला True North, Warburg Pincus, Aether Mauritius आणि Bessemer India या खासगी इक्विटी कंपन्यांचे सहकार्य लाभले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment