IPPB Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक चांगली आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आता इंडिया पोस्ट पेमेंटच्या बँक लिमिटेडने भरती काढलेली आहे. या भरती अंतर्गत तीन वर्षाच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर आता माहिती तंत्रज्ञान एक्झिक्युटिव्हच्या (IPPB Recruitment 2024) पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरती अंतर्गत 54 रिक्त पदांची भरती होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा. 5 मे 2024 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे, तर 24 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.
शैक्षणिक पात्रता | IPPB Recruitment 2024
उमेदवारांनी संगणक, विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी, त्याचप्रमाणे कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन यातील कोणतीही पदवी घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख – 5 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2024
निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. बँकेने मुलाखती व्यतिरिक्त मूल्यांकन गटचर्चा आणि ऑनलाइन चाचणी घेण्याचा अधिकार देखील ठेवलेला आहे .या भरतीसाठी तुमची पात्रता निकष पाहूनच मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
अर्ज कसा करायचा ? | IPPB Recruitment 2024
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर होम पेजवर करियर या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्या ऑनलाईन बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर आता नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी आवश्यक माहिती भरा.
- सूचना काळजीपूर्वक भराण आणि अर्ज करण्यास सुरुवात करा.
- अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.