जोडप्याने शेयर केला ‘असा’ फोटो कि न्यायालयाने ठोठावली तब्बल १६ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराणमधील सोशल मीडिया एनफ्लूएंसर आणि जिमचा मालक अहमद मोईन शिराझी याला पत्नी शबनम शाह रोखीसह १६ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय ७४ चाबूक मारण्याचीही शिक्षा झाली आहे. या संदर्भात शिराजी यांनी अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की आम्हां दोघ जोडीदारांवर सरकारविरूद्ध अपप्रचार करण्यासह सोशल मीडियावर अश्लील पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात अपील करणार
मात्र, पती आणि पत्नी हे दोघेही सध्या आपल्या दोन मुलांसमवेत तुर्की येथे राहत आहेत.२०१९ मध्येच या दोघांनी इराण सोडलेले आहे.शिराजी यांना ९ वर्षांची शिक्षा तर त्याच्या पत्नीला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्यांना ७४ चाबकांच्या फटक्याची शिक्षासुद्धा सुनावण्यात आली आहे.मात्र , सध्या हे जोडपे इराणमध्ये नाहीत आणि त्यांच्या अनुपस्थितीतच ही शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेबद्दल त्यांना आपल्या वकिलांकडून माहिती मिळाली. त्याचबरोबर कोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात आपण अपील करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तथापि, इराणच्या कोर्टाला त्यांना दोषी ठरवायचे आहे, असे शिराजी यांचे म्हणणे आहे. यामुळेच त्याने इराण सोडण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, शिराजीच्या इन्स्टाग्रामवर दीड दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो माजी किक बॉक्सिंग चॅम्पियन आहे. असं म्हटलं जात आहे की शिराजीवर तासनतास या प्रकरणाची चौकशी केली जात होती आणि सोशल मिडीयावर हिजाबची छायाचित्रे पोस्ट करू नका असंही त्यांच्या पत्नीला सांगण्यात आलं होतं. दुसरीकडे, शबनम शाह रोखी तिच्या व्यायामाशिवाय आपल्या मुलांची, नवऱ्याची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करत असते

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.