धक्कादायक! इराणमध्ये तब्बल अडीच कोटी लोक कोरोनाबाधित, राष्ट्राध्यक्ष हसन रुहानींची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तेहरान । कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलं असताना इराणमधून एक गंभीर बातमी समोर आली आहे. इराणमध्ये अडीच कोटी नागरिकांना करोनाची बाधा झाल्याची माहिती इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी दिली आहे. शनिवारी एका दिवसात इराणमध्ये २ लाख ७१ हजार ६०६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती रुहानी यांनी दिली. एवढंच नाही तर इराणमध्ये आणखी साडे ३ कोटी लोक कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकतात अशीही चिंतेत टाकणारी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. रॉयटर्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

इराणच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये आत्तापर्यंत अडीच कोटी नागरिकाना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती रुहानी यांनी त्यांच्या भाषणात दिली. आणखी ३ ते साडे ३ कोटी लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे अशीही भीती त्यांनी बोलून दाखवली. सध्याच्या घडली २ लाख लोक रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत असंही रुहानी यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”  

Leave a Comment