IRCTC : कोकण म्हणजे सुंदर निळाशार समुद्र …! कोकण म्हणजे माडांची झाडं … ! आंबा,काजू,फणस …! आणि बरंच काही… असं हे कोकण म्हणजे उन्हाळी सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन. कोकणातील मालवण सिंधुदुर्गला विशेष पर्यटनाचा दर्जा देखील मिळाला आहे. त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. म्हणूनच (IRCTC) रेल्वे कडून यंदाच्या खास उन्हाळी सुट्टीकरिता विशेष आयोजन केले आहे. त्यामुळे त्यांनी यंदा उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जाणार असाल तर ही माहिती नक्की वाचा.
मुंबईतील लोकमान्य टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान 24 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत 11 एप्रिल 2024 पासून या विशेष गाड्यांच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. खास उन्हाळी सुट्टी करिता मध्य रेल्वे कडून या विशेष सेवा (IRCTC) सुरू करण्यात येणार आहेत. या विशेष गाडीला प्रथम वातानुकूलित एक प्रथम वातानुकूलित कम वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित द्वितीय , सहा वातानुकूलित तृतीय, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन्स आठ जनरल सेकंड क्लास जोडण्यात येणार आहेत.
काय असेल वेळ (IRCTC)
ही विशेष साप्ताहिक ट्रेन 01464 दिनांक 13एप्रिल 2024 ते दिनांक 29जून 2024 पर्यंत दर शनिवारी 16: 20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21: 50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई इथे पोहोचणार आहे. तर 01463 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 11 एप्रिल 2024 ते दिनांक 27 जून 2024 पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई इथून 16 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 20: 45 वाजता कोचीवेली (IRCTC) येथे पोहोचेल.
या स्थकानावर थांबणार (IRCTC)
ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर, एरणाकुलम जं, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबे घेईल.
करता येणार ऑनलाईन आरक्षण
जर तुम्ही हा खास उन्हाळी गाडीसाठी आरक्षण करू इच्छित असाल तर यासाठी दिनांक 8 एप्रिल म्हणजे आजपासूनच ऑनलाईन आरक्षण (IRCTC) करता येणार आहे यासाठी तुम्हाला www.irctc.co.in या संकेतस्थळावर बुकिंग करता येईल.