हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच यासाठी फसवणूक करणाऱ्या लोकांकडून अनेक नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत. आता ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या लोकांकडून रेल्वे प्रवाशांना टार्गेट केले जात आहे. यावेळी तिकीट रिफंड करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. असेच एक प्रकरण समोर आल्यानंतर ट्विटरवर रेल्वेने ट्विट करून लोकांना सावध केले आहे.
संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
एका प्रवाशाने ट्विटरवर रेल्वेकडे तिकीट रिफंडबाबत ट्विट केले. यावेळी त्याने पैसे मिळत नसल्याची तक्रार केली. त्याच्या ट्विटनंतर रेल्वेने आपल्या उत्तरात म्हटले की, तुमचा PNR नंबर आणि मोबाइल नंबर डायरेक्ट मेसेजद्वारे आमच्याशी शेअर करा. IRCTC
ग्राहकाने मेसेजद्वारे त्याची माहिती रेल्वेशी शेअर केली. त्यानंतर रेल्वेने उत्तर दिले की, तुमची तक्रार नोंदवण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुमच्या तक्रारीचा मागोवा घेऊ शकता. तक्रार क्रमांक तुमच्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे पाठवण्यात आला आहे.
यानंतर ग्राहकाने ट्विट केले आणि एक नंबर शेअर केला की, आम्हाला या नंबरवरून (+919348250526) एक फ्रॉड कॉल आला आहे आणि तो माझा UPI पिन मागत आहे. IRCTC
फ्रॉड कॉलपासून सावध रहा
याला उत्तर देताना, रेल्वे सेवेने सांगितले की, सर्व युझर्सना अशा फ्रॉड कॉलपासून सावध राहण्याची विनंती केली जाते. कोणत्याही संशयास्पद लिंक्स किंवा फोन कॉलला उत्तर देऊ नका. याद्वारे तुमच्या पैशांची फसवणूक होऊ शकते. अनेक ट्विटर फॉलोअर्सना अशा फसवणूक करणाऱ्यांकडून टार्गेट केले जात आहे. रेल्वेकडून तक्रार करणाऱ्या युझर्सनाही टार्गेट केले जात आहे. IRCTC
अशी लोकं वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून काही लिंक पाठवून फसवणूक करतात. हे लक्षात घ्या कि, पैसे रिफंडची प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. IRCTC रिफंडमध्ये कोणत्याही माणसाची भूमिका नाही. म्हणजे हे सर्व सिस्टीम द्वारे ऑटोमॅटिक होते. कृपया अशा लिंक्स किंवा कॉलला प्रतिसाद देऊ नका.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/
हे पण वाचा :
YES Bank च्या ग्राहकांना मुदतीआधी FD बंद केल्यास द्यावा लागणार जास्त दंड !!!
येत्या आठवड्यात कोणते घटक Share Market ची दिशा ठरवतील ??? तज्ज्ञांकडून समजून घ्या
PM Kisan च्या KYC सहित 31 जुलैपर्यंत पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामे !!!
SBI ग्राहकांसाठी खुशखबर, आता FD वर मिळणार जास्त व्याज !!!
SIP मध्ये होणारे नुकसान अशा प्रकारे टाळा !!!