हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC प्रवाशांना स्वस्तात फिरायला यावं म्हणून सतत वेगवेगळे टूर पॅकेज (IRCTC Goa Package) घेऊन येत असते. कधी कधी हा प्रवास रेल्वेच्या माध्यमातून करावा लागतो तर कधी कधी विमानातून … आताही IRCTC आपल्या प्रवाशांसाठी खास गोव्याचे टूर पॅकेज घेऊन आलं आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्ही अगदी स्वस्तात विमानाने गोव्याचा प्रवास करू शकताय. तसेच तुमच्या खाण्यापिण्याचा खर्च सुद्धा IRCTC स्वतः करत आहे. हे टूर पॅकेज नेमकं काय आहे? कधीपासून सुरु होणार आणि नेमका खर्च किती हेच आज आपण जाणून घेऊया.
IRCTC चा प्लॅन कसा आहे? IRCTC Goa Package
पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये IRCTC गोव्याचे टूर पॅकेज घेऊन आलं आहे. 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत हा प्रवास असेल. म्हणजेच तब्बल 3 दिवस व 4 रात्री साठीचा हा प्लॅन IRCTC कडून बनवण्यात आला आहे. तुमच्या प्रवासाची सुरुवात विमानाने प्रवासाने होईल. गोवा मध्ये पोहचल्या नंतर तेथून पुढचा प्रवास रस्ते वाहतुकीद्वारे तुम्हाला करवण्यात येईल.
प्रवासासाठी किती खर्च येईल?
या टूर पॅकेजमध्ये (IRCTC Goa Package) तीन जण एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 30,800 रुपये ठेवण्यात आली आहे. तर दोन लोक एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 31, 200 रुपये आहे, तर एका व्यक्तीसाठी पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 37, 700 रुपये आहे. पालकांसोबत राहताना, प्रति मुलाची पॅकेज किंमत रु. 27350 (बेडसह) आणि बेडशिवाय प्रति व्यक्ती 26950 रुपये असेल.
गोवा प्रवासात कुठे दिल्या जातील भेटी?
संपूर्ण सहली दरम्यान गोवा राज्यातील अनेक महत्वाच्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येतील असे IRCTC च्या पॅकेज मध्ये सांगण्यात आले आहे. त्यानुसार तुम्ही गोवा मधील प्रसिद्ध मंदिर मंगेशी मंदिरला भेट द्याल. त्याचबरोबर अगुआडा किल्ला, अंजुना बीच, बेंझ सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम, बॅसिलिका ऑफ बॉन जीसस चर्च, मिरामार बीच, इव्हनिंग मांडोवी रिव्हर क्रूझ, बागा बीच, कँडोलिम बीच आणि स्नो पार्क यांना देखील प्रवासादरम्यान भेट देता येईल.
गोवा प्रवासाच्या बुकिंगसाठी IRCTC वेबसाइट – www.irctctourism.com वरून ऑनलाइन बुकिंग करता येईल.