हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारत आणि चीन दरम्यान हिमालयाच्या कुशीत वसलेला भूतान देश त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे याठिकाणी फिरायला जाण्यासाठी सर्वजण आतुरलेले असतात. हिवाळ्यांच्या सुट्ट्यांमध्ये तर भूतानमध्ये सर्वात जास्त गर्दी असते. तुम्ही देखील जर नोव्हेंबर महिन्यात भूतानला जाण्याचा प्लान करत असाल IRCTC चे पॅकेज तुमच्यासाठी सर्वात जास्त लाभदायी ठरेल. या पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही फक्त 71 हजार रुपयांमध्येच भूतानची ट्रिप करू शकता. चला तर मग जाणून घेऊया IRCTC च्या इंटरनॅशनल पॅकेजविषयी.
8 दिवस आणि 7 रात्र मुक्काम
IRCTC च्या इंटरनॅशनल पॅकेजमध्ये तुम्हाला भूतानमधील थिंपू, पुनाखा आणि पारो या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळत आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही एकूण 8 दिवस आणि 7 रात्री भूतानच्या मुक्कामाचा आनंद घेऊ शकाल. तसेच, पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक ऐतिहासिक ठिकाणे पाहण्याची संधी मिळेल. त्यामुळे हे पॅकेज तुमच्यासाठी भूतान फिरण्यासाठी सर्वात बेस्ट पॅकेज ठरेल.
तिकिटाचे दर
या पॅकेज अंतर्गत सर्व प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी राहण्यासाठी हॉटेल सुविधा देण्यात येईल. यासोबतच ट्रेनमध्ये येताना आणि जाताना खाण्याची सुविधाही मिळणार आहे. एका व्यक्तीला या पॅकेजचा आनंद घेण्यासाठी 71,369 रुपये मोजावे लागतील. दोन लोकांसाठी 51,839 रुपये प्रति व्यक्ती तिकिट आहे. तर तीन लोकांसाठी 50,274 रुपये प्रति व्यक्ती मोजावे लागतील. मात्र या काळात तुमचे संपूर्ण भूतान फिरून होईल. त्याचबरोबर ही ट्रीप तुमची सर्वात खास ठरेल.
असा असेल प्रवास
सर्वात पहिल्यांदा या ट्रिपची सुरुवात आगरतळा रेल्वे स्थानकावरून होईल. तुम्ही कांचनजंगा एक्सप्रेसने 3 AC मध्ये संपूर्ण रात्र प्रवास कराल आणि कूचबिहार रेल्वे स्थानकावर पोहोचाल. यानंतर तुमचा अविस्मरणीय असा भुतांचा प्रवास सुरू होईल. या प्रवासादरम्यान तुम्हाला पॅकेज अंतर्गत सर्व सुविधा पुरवल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला काही एक्स्ट्रा सुविधांची गरज असेल तर त्या देखील तुम्हाला दिल्या जातील. त्यामुळे तुम्ही जर नोव्हेंबर महिन्यात भूतान ला जाण्याचा विचार करत असाल तर या पॅकेजचा नक्कीच विचार करा. या पॅकेजविषयीची अधिक माहिती IRCTC वेबसाईटवर देण्यात आली आहे.