2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढली; ‘ही’ असेल अंतिम तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 1 ऑक्टोंबरपासून संपूर्ण देशांमध्ये 2 हजाराच्या नोटा बंद होणार आहेत. त्यामुळे 30 सप्टेंबर पर्यंतच या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली होती. मात्र आता 2 हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याची आणि जमा करण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना 7 ऑक्टोंबरपर्यंत बँकेत दोन हजाराच्या नोटा जमा करता येणार आहेत. यापूर्वी 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख 2 हजारच्या नोटा बदलण्यासाठी आणि जमा करण्यासाठी देण्यात आली होती.

गेल्या काही महिन्यांपूर्वीच रिझर्व बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयाची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार, सध्या चलनात असलेल्या 3.56 लाख कोटी 2 हजारच्या नोटांपैकी 3.42 लाख कोटी रुपयांच्या नोटा बॅंकांमध्ये परत आल्या आहेत. मात्र आता 0.14 लाख कोटीच 2 हजाराच्या नोटा चलनात राहिल्या आहेत. अशाप्रकारे, 19 मे रोजी चलनात असलेल्या 2 हजारच्या 96 टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. उरलेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंतची तारीख देण्यात आली होती. मात्र आता ही तारीख 7 ऑक्टोंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  8 ऑक्टोबर 2023 पासून बँक शाखांमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा जमा करणे आणि बदलणे बंद करण्यात आले आहे. 8 ऑक्टोबरनंतर कोणालाही दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येणार नाहीत. ही सेवा फक्त 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. मात्र न्यायालये,  संस्था, सरकारी विभाग किंवा सार्वजनिक अधिकारी यांना 2 हजार रुपयांच्या नोटा RBI च्या 19 कार्यालयांमध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय जमा करू शकता येतील. मात्र सर्वसामान्य नागरिकांना फक्त 7 ऑक्टोंबर पर्यंतच दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करुन बदलता येणार आहेत.