हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण भारत हे पर्यटनासाठी अतिशय खास असे ठिकाण आहे. मोठमोठी मंदिरे, अथांग समुद्रकिनारा, प्रादेशिक वेगळेपण, निसर्गरम्य वातावरण या सर्व कारणांमुळे आयुष्यात एकदा तरी दक्षिण भारताची सफर करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आर्थिक अडचणींमुळे अनेक इच्छा असूनही जात येत नाही. परंतु जर तुम्हीही दक्षिण भारताचे पर्यटन करण्याचा विचार करत असाल तर भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC आपल्यासाठी खास स्वस्त टूर पॅकेज घेऊन आलं आहे. याअंतर्गत फक्त 19,620 रुपयांत तुम्ही दक्षिण भारत फिरू शकतो.
IRCTC भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून ‘भारत गौरव- दक्षिण भारत यात्रा, एक्स बेटिया’ चालवणार आहे. या पॅकेजद्वारे तुम्हाला तिरुपती, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमला यांसारख्या सुंदर ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. हे पॅकेज 22 जुलै 2023 रोजी बेतियापासून सुरू होईल. या टूर पॅकेजची किंमत 19,620 रुपयांपासून सुरू होते. IRCTC चे हे पॅकेज 10 रात्री 11 दिवसांचे असणार आहे.
तुम्हाला दक्षिण भारतातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याची चांगली सुवर्णसंधी या टूर पॅकेजच्या माध्यमातून मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या ११ दिवसांच्या प्रवासादरम्यान तुम्हाला खाण्यापिण्याची आणि राहण्याची काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण ही सोय सुद्धा IRCTC स्वतःच करणार आहे. त्यामुळे तुमचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. तुम्ही IRCTC च्या अधिकृत बेवसाईटवर जाऊन या टूर पॅकेजची ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करू शकता.